ठाणे

पालघर : डहाणूच्या समुद्रकिनार्‍यावर आढळली नऊ दुर्मिळ कासव

अनुराधा कोरवी

डहाणू : विनायक पवार :  समुद्रात मच्छीमार नौकांच्या पात्यांमध्ये अडकून तसेच जाळ्यांमध्ये अडकून जखमी कासवे किनार्‍याव येत असतात. डहाणूच्या किनार्‍यावर अशीच जखमी झालेली दुर्मिळ 9 कासवे आढळून आली. त्यामध्ये ऑलिव्ह रिडलेसारख्या दुर्मिळ कासवांचाही समावेश आहे. त्यांच्यावर डहाणू उपवन संरक्षण कार्यालया अंतर्गतपारनाका येथील सागरी कासव संक्रमण व उपचार केंद्रात उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्यांना पुन्हा खोल समुद्रात सोडण्यात आले.

वन कर्मचारी, प्राणीमित्र यांनी नौकेतून कासवांना समुद्रात सोडण्याचा उपक्रम काही वर्षांपासून हाती घेतला आहे. या केंद्रात सध्या अकरा कासवांवर उपचार सुरू असल्याची माहिती वन विभागाने दिली.लाटांसह जखमी कासवे किनार्‍यावर आढळल्यास मच्छिमार कासवांची माहिती वविभागाला देतात. वन विभाग आणि वाईल्ड लाईफ कंझर्व्हेशन अ‍ॅण्ड एनिमल वेल्फेअर असोसिएशन या प्राणीमित्र संस्थेचे स्वयंसेवक सागरी कासव संक्रमण व उपचार केंद्रात ही सुश्रुषा केली जाते.

या केंद्रात उपचारानंतर कासवांना समुद्रात सोडण्यात येते. यंदाही नऊ कासवांना समुद्रात सोडण्यात आले असून या केंद्रात अकरा कासवांवर उपचार सुरू आहेत. या कासवांचे वजन साधारणतः पाच किलोपासून ते 30 किलो पेक्षाही जास्त असते. समुद्र किनार्‍यावर जखमी अवस्थेत आढळलेल्या ऑलिव्ह रिडलेसारख्या दुर्मिळ कासवांवर उपचार करुन त्यांना पुन्हा खोल समुद्रात सोडण्यात आले आहे. या किनार्‍यावर कासव संवर्धनावर विशेष भर दिला जात असून मच्छीमार बांधवांमध्ये जनजागृतीही केली जातेय.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT