ठाणे

पालघर : आता मोह फुलांना मिळणार हमीभाव

सोनाली जाधव

खांडोळा पुढारी वृत्तसेवा :  
पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेले जव्हार आणि मोखाडा तालुके, भौगोलिक दृष्ट्या लाभलेली मोठमोठाली जंगले, नद्या, डोंगरदर्‍या या सगळ्यामुळे जंगलामध्ये निसर्ग स्त्रोताने उगवत असलेले मोह झाड, मोठ्या संख्येने वाढत आहेत, कल्पवृक्ष समजल्या जाणार्‍या मोह झाडाला शासनाच्या नवनवीन धोरणानुसार मोहफुले गोळा करून ते विक्री केल्यास त्यांना योग्य हमीभाव मिळणार आहे, त्यामुळे या भागातील नागरिकांना एका नव्या रोजगारांची हमखास हमी मिळणार आहे. दोन्ही तालुक्यात जंगलात उन्हाळ्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार्‍या मोहफुलांना आता खर्‍या अर्थाने भाव येणार आहे. या फुलांपासून अधिकृतपणे मद्यनिर्मिती करण्याचा निर्णय यापूर्वीच मंत्रिमंडळ बैठकीत झाला होता. गुरुवारी (दि.23) त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. त्यात या देशी मद्याचे विदेशीकरण करण्यामागील भूमिकाही स्पष्ट करण्यात आली. एकीकडे विदेशी मद्याचा दर्जा, तर दुसरीकडे किमतीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जाणार आहे.

म्हणून देशीला केले विदेशी मद्य
वास्तविक मोहाफुलाच्या मद्यार्कापासून बनविण्यात येणारे मद्य हे देशी मद्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. पण यामुळे त्याला मर्यादित ग्राहक वर्ग उपलब्ध होऊन त्याच्या विक्रीवर, किमतीवर मर्यादा येईल. त्यामुळे मोहफुलाच्या दारुला देशीऐवजी विदेशी मद्य असा दर्जा देणे योग्य असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. मात्र त्यास स्थानिक मद्य असे संबोधण्याचा निर्णय घेण्यात आला. यानिमित्ताने ग्रामीण भागात लोकप्रिय असलेल्या मोहाच्या दारूला प्रतिष्ठा मिळवून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे

मद्यार्काचे मिश्रण त्यात करता येणार नाही. याचा फायदा घेऊन मोहा फुलांपासून बनविल्या जाणार्‍या मद्यार्कासाठी पुरेशा प्रमाणात फुले उपलब्ध न झाल्यास दुसरी फुले किंवा फळांपासून उत्पादित मद्यार्क मिश्रण करण्यास मुभा राहणार आहे. मात्र मळी किंवा धान्यावर आधारित किमतीने कमी असलेल्या फुलांचा मद्यार्क या मोहफुलाच्या दारूत मिसळला जाण्याची शक्यता आहे.

मोहाफुलात मिसळता येणार इतर फुलांचा अर्क
द्राक्षापासून तयार केलेल्या मद्यार्काविर पीएलएल अनुज्ञप्ती शुल्क आकारले आधारित ब्रँडी या मद्य प्रकारासाठी जाते. मोहाफुलांच्या मद्यार्कापासून पेय मद्य बनविण्याकरिता हेच शुल्क आकारले जाणार आहे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT