ठाणे

डोंबिवली : भंगार व्यावसायिकाला हप्ते न देण्यावरून बेदम मारहाण

रणजित गायकवाड

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा

स्व मालकीच्याच्या भंगाराच्या दुकानाचे हप्ते देण्यास नकार देणाऱ्या एका भंगार व्यावसायिकाला काटई गावातील काही तरुणांनी मारहाण केल्याचा आरोप भंगार व्यवसायिकाने केला आहे. सध्या हा व्यवसायिक डोंबिवलीतील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असून यासंदर्भात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कटाई नाका येथे गेल्या २२ वर्षापासून राहणारे माणिक चंद गुप्ता (वय ४०) यांनी गेल्या वर्षभरापासून गावातील काही मंडळी हप्ते मागत असल्याच्या तक्रारी मानपाडा पोलीस ठाण्यात केल्या होत्या. मात्र, शुक्रवारी पैशांची मागणी करणाऱ्या संदीप पाटील, विजय पाटील, विशाल पाटील आणि हरिश्चंद्र पाटील यांनी माणिकचंद पैसे देत नसल्याने त्यांना मारहाण केली. ही मारहाण थांबवण्यासाठी मध्ये पडलेल्या पत्नी आणि भाच्यालाही बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत माणिक यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून पत्नीला देखील मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे. याआधी देखील संदीप पाटील यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. मात्र, अजूनही यांना अटक करण्यात आली नसून हे सर्वजण मोकाट फिरत असल्याने पुन्हा आमच्या जीवाला धोका असल्याचे माणिकचंद यांच्या पत्नी धर्मा गुप्ता यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT