ठाणे

ठाण्यात डॉ. मुस रोडवर दिवाळी पहाट यंदा ‘बाळासाहेबांच्या शिवसेनेचीच’

दिनेश चोरगे

मुंबई /ठाणे;  पुढारी वृत्तसेवा :  दसरा मेळाव्याच्या वादानंतर ठाण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या जागेवरून
बाळासाहेबांची शिवसेना आणि ठाकरे गट यांच्यातील वाद मुंबई उच्च न्यायालयात पोहचला. शिवतीर्थाचा निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागला असताना आता दिवाळी पहाटेची उच्च न्यायालयीन लढाई मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिंकली. डॉ. मुस रोडवर आता बाळासाहेबांच्या शिवसेनेचीच दिवाळी पहाट होईल.

ठाण्यात खासदार राजन विचारे यांच्या संस्थेच्या माध्यमातून डॉ. मुस रोड, राजावत ज्वेलर्सच्या ठिकाणी मागील 10 वर्षे दिवाळी पहाटचा कार्यक्रम आयोजित केला जातो. यंदा शिवसेनेत दोन गट पडल्याने या जागेवर दोन्ही शिवसेनांनी दावा केला होता, ठाणे महापालिकेकडे आम्हीच अगोदर परवानगी मागितली असतानाही महापालिकेने
राजकीय हेतूने ती नाकारली, असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला.

आनंद चॅरिटेबल टस्टच्या तीन विश्वस्तांनी ही याचिका पालिकेविरुद्ध दाखल केली होती. आम्ही 2016-17 पासून तलावपाळीच्या याच जागेसाठी दिवाळी पहाटची परवानगी मागत आलो आहोत. त्यामुळे यंदाही तिथे आमचाच हक्क पोहोचतो, असे त्यांचे म्हणणे होते. त्याच वेळी आम्ही प्रथम महापालिका आणि पोलिसांना पत्र दिल्याचा युक्तिवाद बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून करण्यात आला.  बुधवारी झालेल्या सुनावणीत न्या. रमेश धानुका आणि न्या. कमाल आर. खाटा यांनी ठाकरे गटाची याचिका फेटाळून लावली आणि ठाणे महापालिकेने बाळासाहेबांच्या शिवसेनेला दिलेली परवानगी योग्य ठरवली.

आता डॉ. मूस रोडवर बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या दिवाळी पहाटचा आस्वाद ठाणेकर घेतील. आता ठाकरे गटाकडून नव्या जागेचा शोध सुरु आहे. आम्ही देखील दिवाळी पहाट कार्यक्रम करणार असल्याचे शिवसेनेचे
प्रवक्ते चिंतामणी कारखानीस म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT