सापाड; योगेश गोडे : डोंबिवली ग्रामीण परिसरातील सोनारपाडा गावात 70 शेतकर्यांच्या कब्जे वाहिवाटेला असणार्या 81 एकर जमिनीची संरक्षित कुळांसाहित परस्पर विक्री केल्यामुळे मूळ कब्जेधारकांचा प्रशासनाविरोधात आक्रोश व्यक्त होत आहे. 1938 पासून
कब्जेवाहिवाटेला असणार्या शेतकर्यांची कुळांची नावे असणार्या जमिनीची विक्री करण्यास दिलेली परावांनी तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी शेकडो ग्रामस्थांनी लागवड शेतातील चिखलात उतरून सरकारच्या हुकूमशाही पद्धतीचा विरोध दर्शविला आहे.
कब्जेवाहिवाटित असणार्या संरक्षित कुळांची जमिनी शेतकर्यांना परत मिळाली नाही तर शेकडो शेतकरी आत्मदहन करणार
असल्याचा इशारा शेतकरी भूमिपुत्र अन्याय निवारण संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेश म्हात्रे यांनी दिला. डोंबिवली सोनार पाडा गावात 1938 सालापासून पूर्वजांच्या कब्जेवाहिवाटिला असणार्या 81 एकर जमिनीची शेतकर्यांना विश्वासात न घेता संरक्षित कुळांसाहित विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
कब्जे वाहिवाटीच्या जमिनीची परस्पर विक्रीमुळे स्थानिक शेतकर्यांचा आक्रोश उफाळून आला असून जमिनीच्या विक्रीसाठी
दिलेली परावांगी तात्काळ रद्द करण्यासाठी पीडित शेतकर्यांनी अनेक आंदोलने उपोषणे केली मात्र त्याचा कोणताही परिणाम या
अधिकार्यांवर झाला नाही. शेती हा एकमेव व्यवसाय असणार्या शेतकर्यांच्या शेतजमिनी परस्पर विक्री केल्यामुळे सोनारपाडा
गावातील शेतकर्यावर आज उपासमारीची वेळ आली आहे. उपासमारीमुळे मरण्यापेक्षा सरकारचे डोळे उघडण्यासाठी कुटुंबासाहित आत्मदहन करणार असल्याचे सांगत पीडित शेतकरी गणेश म्हात्रे यांनी लागवड शेतातील चिखलात उतरून सरकारच्या हुकूमशाही
पद्धतीचा निषेध केला
मुंबई गोग्रास भिक्षा सोसायटीने 7 नोव्हेंबर 2007 रोजी 80.71 एकर जमीन फक्त सातबारा सदरी नावे असणारी जमीन मिळकत सर्वे नंबर 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 113, 115, 116, 118, 19, 24, 125 असे आहेत. ज्या जमिनीमध्ये 1 ते 71 कुळांची नावे कब्जे वहिवाटी मधील शेतकर्याच्या कब्जात कसत असलेल्या जमिनी आहेत. या कुळांसहीत जमिनीची विक्रीसाठी शेतकर्यांना विश्वासात न घेता केल्यामुळे सोनारपाडा परिसरातील शेतकर्यावर आज उपासमारीची वेळ आली आहे. या सर्व जमिनीचा 1938 पासून पूर्वजांकडून पेंढा, गवत आणि रोख रक्कमेच्या स्वरूपात खंड भरला जात असल्याच्या पावत्या शेतकर्यांकडे आहेत. या जमिनीवर भातशेती करून 70 कुळांचा उदरनिर्वाह सुरू आहे. फक्त सातबारा सदरी मुंबई गोग्रास भिक्षा सोसायटीचे नाव लागले आहे. मात्र ही जमिन सोनारपाडा गावातील मूलनिवासी भूमिपुत्र शेतकर्यांच्या कुलकब्जे वहिवाटीस आहेत.
या जमिनीमध्ये आजही भातासह भाजीपाल्याची पिके शेतकरी घेत असून तसा अहवाल तलाठी दावडी यांच्याकडून देण्यात आला आहे. मात्र 7 नोव्हेंबर 2007 रोजी या 71 कुळांना आपले म्हणणे मांडण्याची संधी न देता परस्पर शेतकर्यांच्या कब्जे वाहिवाटीला असणारी
81 एकर जमीन विकण्यासाठी परावांगी मंजूर करण्यात आल्यामुळे भारतीय संविधान 21 चा भंग केल्याचा आरोप पीडित शेतकरी गणेश म्हात्रे यांनी केला आहे. विशेष म्हणजे मुंबई गोग्रास भिक्षा सोसायटी ही जमीन वैद्यकीय शिक्षणासाठी, मंदिर, दुग्धशाला किंवा कुटीर
उद्योग स्थानिक लोकांना रोजगारासाठी त्याचप्रमाणे समाजातील कमकुवत घटकांना गृहनिर्माणासाठी, रोटरी क्लब, लायन्स क्लब सारख्या संस्थांना देऊ शकते. असे असताना मेसर्स अजय प्रताप, आशर मेसर्स आशय रियलटर्स यांना विक्री परवानगी देऊन नियम 37 चा भंग
केला असल्याचा आरोप देखील म्हात्रे यांनी केला आहे.
गरीब अशिक्षित शेतकर्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन मुंबई गोग्रास भिक्षा सोसायटीने आपली नावे सातबारावर चढवुन आमच्याकडून खंड भरण्यासाठी मागणी करून लागले त्याचप्रमाणे आम्ही व आमच्या पूर्वजांनी पेंढा, गवत व रोख रक्कम स्वरूपात खंड देऊ
लागलो. त्यांनी तेव्हापासून ते आत्तापर्यंत (1938 ते 1993) खंड भरलेला आहे. ही जमीन विक्री साठी टेंडर भरण्यात आला. यामध्ये आशर रीसलटर्स, ओम साईराम स्थापत्य, निखिल डेव्हलपर्स, निलेश गांधी, जतिन जानी यांनी लिलावमध्ये भाग घेऊन बोली लावली. यामध्ये सर्वात जास्त बोली अशार रीसलटर्स यांनी लावली मग 6 मार्च 2007 रोजी कुठल्या अनुषंगाने साठेकरार केला गेला. परिणामी
या व्यवहारात 500 कोटीचा घोटाळा झाल्याचे गणेश म्हात्रे यांनी उघडकीस आणला आहे.