ठाणे

ठाणे : शहापूरमध्ये दोन वर्षात 50 ट्रान्सफॉर्मर चोरीला

दिनेश चोरगे

शहापूर; पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील गावांमध्ये सुमारे 70 हजार घरगुती विद्युत ग्राहक असून गेल्या दोन वर्षात तालुक्यातील 50 ठिकाणचे तर मागील दीड महिन्याच्या कालावधीत महावितरणचे सात ट्रान्सफॉर्मर चोरले आहेत. बावघर कातकरी वाडी, डोळखांब पाणीपुरवठा, वार्‍याचा पाडा, बिरवाडी पाणी पुरवठा, ओवर टाऊन, लवले पाणीपुरवठा, सैनी फार्म हाऊस आदी गावांचा समावेश आहे. या ट्रान्सफॉर्मर
चोरीच्या घटनांमध्ये दोन वर्षात दीड करोड चे आर्थिक नुकसान महावितरणचे झाले असून तालुक्यातील किन्हवली, खर्डी आणि शेणवा भागात प्रामुख्याने या ट्रान्सफॉर्मर चोरीचे गुन्हे घडले आहेत.

या गुन्ह्यांमुळे महावितरणचे दीड कोटीचे नुकसान झाल्याचे महावितरणच्या अधिकार्‍यांनी सांगितले. तसेच हे नुकसान टाळण्यासाठी महावितरणने विशेष मोहीम हाती घेतली आहे. जागरुक विद्युत ग्राहकांना या बाबतीत कुठल्याही प्रकारची माहिती असल्यास नजीकच्या महावितरण कार्यालयात किंवा पोलीस ठाण्यात कळवा असे जाहीर आव्हान केले आहे.

ट्रान्सफॉर्मर चोरी बाबतीत नागरिकांनी आपणास कुठल्याही प्रकारची माहिती असल्यास नजीकच्या महावितरण कार्यालयात किंवा पोलीस ठाण्यात कळवा जेणेकरून महावितरणचे व शासनाचे आर्थिक नुकसान टाळता येईल. ग्राहकांना अखंडित विद्युत पुरवठा करण्यास महावीतरणास मदत होईल.
– अविनाश कटकवार, उपकार्यकारी अभियंता, शहापूर महावितरण

SCROLL FOR NEXT