ठाणे

ठाणे : मॅट्रिमोनी साईटवरून महिलांना गंडा; ठाण्याच्या ठकाला बेड्या

दिनेश चोरगे

ठाणे;  पुढारी वृत्तसेवा :  विवाह जुळवणार्‍या मॅट्रिमोनी साईटवरून महिलांना खोट्या नावाने प्रोफाईल पाठवून त्यांची आर्थिक फसवणूक करणार्‍या भामट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. राजेश ऊर्फ राज देशमुख ऊर्फ रुपेश शिवाजी यशवंतराव (वय 42, रा. काल्हेर गाव, ता. भिवंडी, ठाणे) असे त्याचे नाव आहे. त्याने आपले लग्न झालेले असतानादेखील घटस्फोटित असल्याचे भासवले. लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक व आर्थिक शोषण केले. त्याने आतापर्यंत अशाच प्रकारे लग्नाचे आमिष दाखवून अनेक महिलांची फसवणूक केल्याचे पोलिस तपासातून उघड झाले आहे.

कळवा येथे राहणार्‍या एका घटस्फोटित महिलेने लग्न जुळवणार्‍या वेबसाईटवर आपले नाव नोंदणी केले होते. या वेबसाईटवरून रुपेश याने त्यांच्याशी संपर्क साधला. आपण उच्च पदावर नोकरीला आहोत. आपला घटस्फोट झाले आहे, असे त्याने भासवले. त्यानंतर ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवले. 2018 ते 2020 या काळात शारीरिक अत्याचार केला. इतकेच नव्हे, तर या महिलेकडून 13 लाख 60 हजार रुपये उकळले. मात्र, याच दरम्यान त्याचे लग्न झाले असल्याची माहिती तिला मिळाली.

आपली फसवणूक होत असल्याचा संशय तिला आला. त्यानंतर तिने कळवा पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याने आतापर्यंत महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर अनेक महिला आणि मुलींची फसवणूक केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT