file photo  
ठाणे

ठाणे : बिडी ओढत काम करणे बेतले जीवावर; स्फोटात दोघे ठार

दिनेश चोरगे

भिवंडी; पुढारी वृत्तसेवा :  बिडी ओढत भंगार गोदामात काम करणे दोन जणांच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे. मृतकमधील एक जण बिडी ओढत असतानाच बिडीची ठिणगी केमिकल ड्रममध्ये पडताच जबरदस्त स्फोट होऊन या स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना भिवंडी शहरालगत असलेल्या खोणी ग्रामपंचायत हद्दीतील तळवळी नाका भागातील घरत कंपाउंडमधील भंगार गोदामात घडली आहे. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

भिवंडी शहरी व ग्रामीण भागातील गोदाम पट्ट्यात लहान मोठ्या भीषण आगीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने ज्वालामुखीचा तालुका अशी ओळख भिवंडी तालुक्याची निर्माण झाली आहे. गेल्या वर्षभरात सुमारे २०० हुन अधिक आगीच्या घटना घडल्याच्या भिवंडी अग्रिशमन दलाच्या कार्यालयातील नोंदीवरून उघडकीस आले आहे. त्यातच यंदाच्या जानेवारी महिन्यातही आगीच्या १० घटना तर बुधवारी १ फेब्रुवारी रोजी पुन्हा सकाळी साडे आठ वाजल्याच्या सुमारास भिवंडीत अग्नी तांडवच्या दुर्घटनेत रमजान कुरेशी (४६) व ईशराईल शेख (३५) असे जागीच ठार झालेल्यांची नावे आहेत. उघड्यावरच भंगार गोडाऊनमध्ये केमिकलचा वापर करून पिशव्या धुण्याचे काम बुधवारी सकाळच्या सुमारास दोघे मृतक करीत होते. त्यातच एक जनाला बिडी ओढण्याची तलप लागल्याने त्याने बिडी पेटवत केमीकल ड्रमची साफसफाई करत असतानाच बिडीची ठिणगी त्या केमीकल ड्रममध्ये पडल्याने ड्रमचा स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूच्या इमारतींचे खिडकीचे काच देखील फुटली आहेत. घटनास्थळी अग्निशमन दल व पोलिसांनी दाखल होत लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT