डोळखांब; दिनेश कांबळे : धरणांचा तालुका अशी ओळख असणाऱ्या शहापूर तालुक्यासाठी यावर्षी टंचाईग्रस्त गावपाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी पन्नास कोटींचा आराखडा मंजुर असतांना तालुका टँकरमुक्त केव्हा होणार, हा प्रश्न आहे. गेली अठ्ठावीस वर्षे १८८ पाणी योजनांचे प्रस्ताव वनविभागाचा अडथळा व इतर कारणांनी स्थगित आहे. पंचायत समिती पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आल्याने जल जिवन मिशनची खिरापत देखील जैसे थे आहे. तसेच भावली पाणी योजनाही बारगळली. त्यामुळे तालुक्याची पाणीटंचाई आज मितीस कायम आहे.
ठाणे-मुंबई सारख्या शहरांना दररोज प्रतिताशी साडे चार हजार दशलक्ष घनमीटर पाणी पुरवठा करणारी भातसा, तानसा, वैतरणा यांसारखी जलाशय शहापूर तालुक्यात आहेत. तर शाई, मुमरी, काळु सारखी धरण प्रस्तावित आहेत. मात्र शहापुर तालुक्याची परिस्थिती धरण उशाला, कोरड घशाला अशीच आहे. यावर्षी केंद्र शासनाच्या १८८ मंजुर प्रस्तावांना वनविभाग व इतर परवानग्यांचे ग्रहण लागले आहे. तर शहापूर तालुक्यातील ९७ गावे आणी २५९ पाडे भावली योजनेवर अवलंबुन आहेत. त्यातच वन परवानग्या, रेल्वे क्रॉसिंग, जमीन अधिग्रहण आदि समस्या अनुत्तरीतच आहेत. सन २००४ पासुनच्या पाणी योजना केवळ कागदावरच पुर्ण झाल्याने अठ्ठावीस वर्षात करोडो रूपयांचा चुराडा झाला आहे. त्यामुळे शहापूर तालुका आजही तहानलेलाच आहे. मागिल वर्षी तालुक्यासाठी १२ कोटींचा टंचाई आराखडा मंजुर होता. यावेळी ३२ गाव व १३७ पाड्यांना २५ टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी २ कोटी १० लाख रूपये खर्च झाला आहे. तर यावर्षी पन्नास कोटी रूपयांचा पाणी टंचाई आराखडा मंजुर असुन टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी ३ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षीत आहे.
सद्यस्थितीत ५७ गावपाड्यांना १६ टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. एप्रिल असल्याचे सांगितले जाते. आराखड्यामध्ये टँकरने पाणी पुरवठा करने, विहीरी अधिग्रहित करने, नळ महिन्यापर्यंत टँकरची संख्या वाढविण्यात येणार पाणी पुरवठा योजना विशेष दुरूस्ती, पुरक नळ पाणी पुरवठा योजना दुरूस्ती, नविन विंधन विहीर हातपंप घेणे आदि कामांचा समावेश आहे. जलजिवन मिशनच्या ११० ग्रामपंचायतमध्ये १८८ योजना, त्याच ठिकाणी भावली योजना? याचाच अर्थ आधीच्या सर्व योजनांवरील येवढ्या वर्षातील खर्च अधिकारी, ठेकेदार, नेते, तांत्रिक सल्लागार ,अध्यक्ष, सचिव यांनी लाटला असल्याचे स्पष्ट आहे.