ठाणे; पुढारी वृत्तसेवा : घोडबंदर रोडवरील लॉकिम कंपनीच्या समोर असलेल्या स्काय वॉकवर पायी जाणार्या अल्पवयीन मुलीस एकट्यात गाठून तिचा विनयभंग करणार्या मनोविकृतास चितळसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. स्कायवॉक वरून एकट्या जाणार्या महिलांना गाठून हा मनोविकृत त्यांचा विनयभंग करीत असे. गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याने परिसरात भीती
पसरली होती. त्यामुळे हा प्रकार रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले होते. दरम्यान, चितळसर पोलिसांनी सदर परिसरातील चाळीसहून अधिक सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून आरोपीचा शोध घेतला व त्यास अटक केली. दिनेश बाकेलाल गौड (32, मनोरमा नगर, ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मनोविकृत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेतील पीडित अल्पवयीन मुलगी 11 ऑगस्ट रोजी सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घोडबंदर रोड रोडवरील लॉकिम कंपनीच्या समोर असलेल्या स्काय वॉकवर पायी जात होती. यावेळी एका अज्ञात इसमाने पाठमागून येऊन तिचा विनयभंग
केला. पीडित मुलीने हिंमत दाखवत आरोपीस प्रतिकार करून आपली सुटका करून घेतली. त्यानंतर पीडित मुलीने पालकांसह चितळसर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. दरम्यान, याच परिसरात गेल्या काही दिवसांपासून स्कायवॉकवरून एकट्या
जाणार्या महिलांना गाठून हा मनोवकृत त्यांचा विनयभंग करीत होता. गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याने परिसरात भीती पसरली होती. त्यामुळे या घटनेची गंभीर दखल घेत चितळसर पोलिसांनी घटनास्थळ व परिसरातील सुमारे चाळीसहून अधिक सीसीटीव्ही फुटेज पडताळून बघितले. त्यातून आरोपीचा शोध घेऊन त्याच्या शरीरयष्टी वरून त्याची ओळख पोलिसांनी शोधून काढली व
त्यास 14 ऑगस्ट रोजी रात्री 11.40 वाजेच्या सुमारास मनोरमा नगर परिसरातून अटक केली.
अटकेतला आरोपी मनोविकृत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. इतर महिलांसोबत घडलेल्या घटनेबाबत आम्ही अधिक माहिती घेऊन पुढील सखोल तपास करीत आहोत असे चितळसर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील यांनी सांगितले.