ठाणे

केडीएमसीत 12 लाख 39 हजार मतदार प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी जाहीर; 

अमृता चौगुले

कल्याण : पुढारी वृत्तसेवा :  कल्याण-डोंबिवली पालिकेच्या आगामी सार्वत्रिक पालिका निवडणुकी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्दे शानुसार प्रभाग निहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी पत्रकार परिषदेत दिली. पालिका निवडणुकीसाठी 44 प्रभागांकरिता 12 लाख 39 हजार 130 मतदारांची यादी घोषित करण्यात आली असून हे मतदार पालिकेतील सत्ताधार्‍यांची निवड करणार आहेत.

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कल्याण-डोंबिवली पालिकेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक पालिका निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम देण्यात आला होता. त्यानुसार 31 मे 2022 च्या अस्तित्वात असलेल्या पालिका क्षेत्रातील कल्याण पश्चिम (138), कल्याण पूर्व (142), डोंबिवली(143) व कल्याण ग्रामीण (144) या चारही विधान सभेच्या विधान सभा मतदार यादींची फोड  करून पालिकेच्या 44 प्रभागांसाठी प्रभाग निहाय प्रारुप मतदार याद्या तयार करून राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

पालिका क्षेत्राची सन 2011 च्या जनगणने नुसार एकूण 15 लाख 18 हजार 762 लोकसंख्या असून पालिकेत प्रथमच त्रिसदस्यीय पद्धतीने निवडणूक घेतली जाणार आहे. पालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण 44 प्रभाग असणार असून यामध्ये तीन सदस्यांचे 43 प्रभाग व चार सदस्यांचा एक प्रभाग असणार आहे. 44 प्रभागांच्या निवडणुकी प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीत 12 लाख 39 हजार 130 मतदार संख्या असून यामध्ये 6 लाख 61 हजार 822 पुरुष मतदार, 5 लाख 76 हजार 934 स्त्री मतदार तर 374 तृतीयपंथी मतदार आहेत.

पालिकेच्या निवडणूक विभागाच्या kdmcelection.com या संकेतस्थळावर लेखी सुचनांकरिता येणार आहेत. 31 मे रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या निवडणुका ग्राह्य धरण्यात येणार आहेत. कालावधीत हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिक होणार्‍या चुका, मतदारांचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नसणे आदी संदर्भातच दुरुस्त्या करण्यात येतील, असे मतदारांना अवगत करण्यात आले आहे. विहीत कालावधीत झालेल्या हरकती व सूचनांचे नियमानुसार निराकरण करून 9 जुलै रोजी अंतीम प्रभाग निहाय याद्या प्रसिद्ध होणार, अशीही माहिती आयुक्‍तांनी दिली.

SCROLL FOR NEXT