उल्हासनगर : पुढारी वृत्तसेवा : उल्हासनगर मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख आणि त्यांच्या पुतण्याला जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचे पत्र त्यांच्या कार्यालयात मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केल आहे.
उल्हासनगर कॅम्प 4 च्या लालचक्की चौकात मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. रविवार सायंकाळी 6 ते 10 च्या दरम्यान लालचक्की येथील कार्यालयात हे धमकीच पत्र टाकले होते. रात्री 10 वाजता बंडू देशमुख यांच्या पुतण्या तन्मेष हा ऑफिस बंद करायला गेला, तेव्हा त्याला हे पत्र मिळाले. त्याने घरी येऊन ते पत्र मला ते पत्र दाखवले. या पत्रात थेट बंडू देशमुख आणि तन्मेष देशमुख यांना जिवेठार मारण्याची धमकी दिली होती. तू आणि तन्मेष हिशोबात रहा नाही तर दोघांना संपून टाकू, जास्त मस्ती आली आहे. तुम्हाला खास करून त्या तन्मेषला समजून ठेवा असा उल्लेख या पत्रात केला आहे.
याप्रकणी विठ्ठलवाडी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. याबाबत बंडू देशमुख यानी सांगितले की काही दिवसापूर्वी सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये असेच पत्र टाकण्यात आले होते, पण कोणी तरी खोडसाळपणा केला असेल म्हणून मी त्याकडे लक्ष दिले नाही. परंतु हे पत्र आज दुसर्यांनदा टाकण्यात आले असून आम्ही काल रात्री विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनला या पत्राबाबत रितसर गुन्हा दाखल केला आहे.