Yashshree Shinde file photo
ठाणे

Yashshree Shinde Murder: फोटो व्हायरल करण्याची धमकी देत बोलावले त्यानंतर...

Yashshree Shinde: यशश्री हत्याकांड प्रकरणात नवा खुलासा; दाऊद शेख गुन्हेगार प्रवृत्तीचाच

पुढारी वृत्तसेवा

उरण : उरणची युवती यशश्री शिंदे हिच्या निर्घृण हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या मुख्य आरोपी दाऊद शेख याच्या जबाबातून गेल्या दोन दिवसात निरनिराळे खुलासे बाहेर येऊ लागले आहेत. आरोपी दाऊदकडे या दोघांचे काही खासगी फोटो होते. ते फोटो कोणी पाहू नये अशी यशश्रीची इच्छा होती. मात्र आरोपीने तरुणीला ते फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. (Uran Yashshree Shinde Murder Case)

दाऊदने बंगळुरहून आणले होते दोन चाकू

त्यानंतर 24 जुलै रोजी जुईनगर रेल्वे स्थानकाजवळ तो तरुणीला भेटला. यानंतर आरोपीने तिला 25 जुलैला सतत फोन करून भेटायला बोलवलं. ती भेटायला तयार नव्हती, तेव्हा त्याने तो फोटो त्याच्या फेसबुकवर टाकला. फोटो पाहताच तिने पुन्हा भेटायला होकार दिला. आरोपींने पोलिसांना सांगितले की, भेटल्यावर यशश्रीने फेसबुकवरून फोटो डिलिट करण्यास सांगितले आणि त्याने फोटो डिलिट केला. यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि तरुणीनेही आपल्या मित्राला मदतीसाठी बोलावून आपण अडचणीत असून मदतीची गरज असल्याचे सांगितले. दरम्यान आरोपीने चाकूने यशश्रीची हत्या केली. आरोपी दाऊदने बंगळुरहून दोन चाकू आणले होते, त्यातील एक चाकू वापरून त्याने यशश्रीची हत्या केली. यामुळे तपास अधिकारीही संभ्रमात पडले आहेत. जोपर्यंत हत्या कोणत्या कारणासाठी केली हे उघड होत नाही तोपर्यंत विविध मार्गांनी दाऊदची चौकशी सुरूच ठेवली जाणार असल्याचे तपास अधिकारी अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ष्ट केले.

यशश्रीच्या शरीरावर दाऊद शेख याच्या नावाचे टॅटू

यशश्री शिंदे हत्याकांडात नवनवे खुलासे होत आहेत. नव्या माहितीनुसार, यशश्री शिंदे हिच्या शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरावर दोन टॅटू आढळून आले आहेत. विशेष म्हणजे हे टॅटू दाऊद शेख याच्या नावाचे होते. मात्र हा टॅटू यशश्रीच्या संमतीने काढण्यात आला की यासाठी तिच्यावर जबरदस्ती करण्यात आली, याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही. दाऊद शेखला अटक करून दोन दिवस उलटले आहेत. त्याच्या चौकशीत बर्‍याच गोष्टी स्पष्ट होऊ शकतात. लग्नाला नकार दिला म्हणून तिची हत्या करण्यात आल्याचं दाऊदकडून सांगितलं जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT