यशश्री शिंदे हिच्या हत्येप्रकरणी आरोपी दाऊद शेख pudhari news network
ठाणे

Yashshree Shinde : यशश्रीच्या मारेकर्‍याला तत्काळ अटक करा; उरणमध्ये संतप्त मोर्चा

पुढारी वृत्तसेवा

जेएनपीए / उरण: उरणमध्ये यशश्री शिंदे हिची निर्घृण हत्या करण्यात आल्याने शहरात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणाचे तीव्र पडसाद रविवारी उरण, पनवेलमध्ये उमटले. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी बंदची हाक देत आपला संताप व्यक्त केला. आरोपीला तात्काळ अटक करुन फाशीची शिक्षा दिली जावी, जलदगती न्यायालयात हा खटला चालवावा, अशा मागण्या पोलिसांकडे करण्यात आल्या. (Yashashri Shinde Uran Murder case)

यशश्रीचा खून करणाऱ्या आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांची चार पथके रवाना झाली आहेत, मात्र आरोपी पोलिसांना चकवा देत आहे. तो सतत आपलं लोकेशन सतत बदलत असल्याची माहिती न्हावा - शेवा बंदर विभागाचे सहय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल नेहून यांनी दिली आहे. दरम्यान दुसरीकडे यशश्री शिंदेच्या हत्येमुळे वातावरण चांगलंच तापलेलं आहे. यशश्री शिंदेची निर्घुण हत्या करणाऱ्या आरोपीला तत्काळ फासावर लटकवा, अशी घोषणाबाजी करत हजारो नागरिकांनी रविवारी (दि.२८) रोजी उरण पोलीस ठाण्यावर अक्रोश मोर्चा काढला, या मोर्चात महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या.

उरण : संतप्त मोर्चा उरण पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर आक्रमक झाला आणि जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत येथेच ठाण मांडण्याचा निर्धार केला.

आरोपी हा विशिष्ठ समाजाच्या असल्याने हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप करुन राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी पोलीस यंत्रणेला फैलावर घेत फरार आरोपीचा तातडीने शोध घेत त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. जोपर्यंत आरोपीला पकडत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार नाही, अशी भूमिका घेतलेल्या नागरीकांची पोलिस आणि यशश्री शिंदे यांच्या कुटूंबियांनी समजूत घातल्यानंतर अखेर शोकाकूल वातावरणात प्रचंड लोकांच्या उपस्थित अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी यशश्रीच्या हत्येचा निषेध म्हणून उरणमधील सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. महात्मा गांधी यांच्या पुतळ्या जवळून हा मोर्चा काढण्यात आला होता. हा संतप्त मोर्चा उरण पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर आक्रमक झाला आणि जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत येथेच ठाण मांडण्याचा निर्धार केला. पोलीस आणि राजकीय पुढार्‍यांनी अखेर संतप्त नागरीकांची समजूत काढून दोन दिवसात आरोपीला पकडण्याचे आश्वासन दिल्यानंतर अखेर मोर्चा मागे घेण्यात आला. यावेळी शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.(Yashashri Shinde Uran Murder case)

उरण बाजारपेठ बंद

शनिवारी उरणची बाजारपेठ उत्स्फूर्त पणे बंद करण्यात आली होती. त्यानंतर रविवारी देखील हत्येचा निषेध म्हणून उरण बाजारपेठ बंद करण्याचा आणि निषेध मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

हत्या करणार आरोपी हा दाऊद शेख हाच असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र सध्या हा आरोपी फरार असून त्यांने आपल्या जवळील दोन्ही मोबाईल नंबर बंद करून ठेवल्याने त्याला पकडण्यात अडचणी येत आहेत. पोलिस आपल्या परिने कसोशिने तपास करत असून आरोपीला जास्तीत जास्त कडक शासन होण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
राजेेंद्र पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरण

पनवेलमध्येही हत्येचा निषेध

गेल्या काही महिन्यात नवी मुंबई शहरातील वेगवेगळ्या दोन घटना मध्ये दोन महिलांचा अमानुष पद्धतीने हत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत, त्यामुळे नवी मुंबई कोपरखैरणे येथील हत्येची घटना ताजी असताना यशश्रीची च्या पद्धतीने हत्या करून तिचा मृतदेह फेकला आहे. याची चीड सध्या नागरिकांमध्ये दिसून येत आहे. या घटनेच्या निषेधार्थ रविवारी ठिकठिकाणी निषेध मोर्चे काढून घटनेचा निषेध व्यक्त केला.

तुरुंगवास भोगल्यानंतर केलं क्रूर कृत्य

नराधम दाऊद शेख हा मूळचा कर्नाटकचा रहिवासी असून उरण येथे ड्रायव्हरचं काम करत होता. त्याची इथेच मयत यशश्रीशी भेट झाली. पोलिसांच्या माहितीनुसार याच मुलीच्या संदर्भात त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता आणि त्यातच त्याला तुरुंगवासही झाला. काही महिन्यांपूर्वी तो बाहेर आला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा मुलीच्या संपर्कात येऊन ही घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीच्या जवळच्या सहकाऱ्यांना व परिवारातील लोकांना ताब्यात घेतले असून चार टीम बंगळूरूला रवाना झाल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT