ठाणे

Thane News | आजारांना दूर ठेवण्यासाठी रानभाज्या गुणकारी

पुढारी वृत्तसेवा
माथेरान : मिलिंद कदम

पावसाळा सुरू झाला की रानभाज्या यायला सुरुवात होते. एरवी बाकीच्या भाज्या आपण वर्षभर खातोच. पण रानभाज्यांचे वैशिष्ट्य असे की त्या फक्त पावसाळ्याचे २ ते ३ महिनेच मिळतात. आपल्या इतर भाज्यांप्रमाणेच या भाज्या खूप गुणकारी असतात. त्यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह, अण्टीऑक्सिडंट्स, फायबर असतात. त्यामुळे या भाज्यांमधील पोषक गुणांचा लाभ शरीराला मिळण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसांत या काही रानभाज्या आवर्जून खायलाच पाहिजेत, असं आहारतज्ज्ञ सांगतात.

सह्याद्रीच्या टापूमध्ये अनेक प्रकारच्या रानभाज्या पावसाळ्यात आढळून येतात. अगदी सहज ओळखण्याजोग्या रानभाज्या आपणास वर्षाऋतूमध्ये आजूबाजूला आढळून येतात. यामध्ये सर्वात जास्त आढळणारी भाजी म्हणजे टाकळा, याची भाजी पौष्टिक मानली जाते. रस्त्याच्या

रानभाज्या खाण्याचे फायदे

शेवगा ही रानभाजी बहुतेक सगळ्याच प्रांतात आढळून येते. मधुमेह, हृदय, संधीवात, बद्धकोष्ठता असा त्रास कमी करण्यासाठी शेवगा उपयुक्त ठरतो, अंबाडीच्या भाजीतून व्हिटॅमिन ए, लोह, झिंक, भरपूर प्रमाणात मिळते. त्यामुळे ही भाजी डोळ्यांच्या आरोग्यासाठी तसेच अशक्तपणा कमी करण्यासाठी फायदेशीर आहे, करटोली या रानभाजीतून प्रोटीन्स, लोह, अॅण्टीऑक्सिडंट्स, फायबर मोठ्या प्रमाणावर मिळतात. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी ही भाजी उपयुक्त आहे, अळूच्या भाजीतून व्हिटॅमिन ई, मॅग्रेशियम मिळते. ही भाजी हृदयरोगाचा, कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करते, भरपूर पोषण देणाऱ्या रानभाज्या आरोग्याचा ठेवा म्हणून ओळखल्या जातात.

आजूबाजूला जेथे नजर फिरेल तेथे आपणास हिरव्यागार पानांचा टाकळा वाढलेला आढळून येतो. टाकळ्याच्या पानांमध्ये जीवनसत्त्वांसोबत लोहसुद्धा काही प्रमाणात असते. त्वचा रोगांमध्ये सर्वश्रेष्ठ भाजी म्हणून टाकळा या जंगली भाजीकडे पाहिले जाते. टाकळ्याचे पंचांग उदा. पाने, खोड, मूळ, फुले, बीज यांचे वेगवेगळे उपयोग आहेत. बांबूच्या कोवळ्या पानांची भाजी, अळूची भाजी, अळंबी, अमरकंद, कर्टोली, कुलू, कुरडू, दिंडा, रानभेंडी, शतावरी वगैरे पावसाळ्यामध्ये स्थानपरत्वे वाढणाऱ्या भाज्या वेगवेगळ्या असतात. जंगलातून, डोंगरदऱ्यातून चालताना अनेकदा भारंगी दिसून येते. मोठी पाने व त्याच्या कडेवर असलेले कात्रे व मध्यभागी तुऱ्यावर असलेली निळसर वर्णाची फुले ही भारंगीला आकर्षक बनवतात.

कपाळफोडीसुद्धा पावसाळ्यामध्ये फार आढळते. त्याचप्रमाणे शेवळासुद्धा जास्त प्रमाणात आढळतो. या सर्व रानभाज्या पावसाळ्यात कोकणामध्ये आढळून येतात. सर्व रानभाज्यांचे आरोग्यदायी गुण आहेत. प्रत्येक भाजीचे गुणधर्मसुद्धा वेगवेगळे आहेत. मधुमेहासह चरबीचे विकार, वजन वाढणे, पोटाचे आजार, बद्धकोष्ठता याच्यासाठी टाकळ्याची भाजी बहुगुणी मानली जाते. अळंब्यांचे विविध प्रकारसुद्धा आढळतात. यामध्ये काही प्रकारची अळंबी ही विषारी असतात. पण या भूछत्रांमध्ये आतड्यांचा कर्करोग बरा करण्याची ताकद आहे.

SCROLL FOR NEXT