Water Cut  pudhari file photo
ठाणे

Water Cut | मंगळवारी कल्याण-डोंबिवली मध्ये पाणी नाही

जलशुद्धीकरण केंद्रांत देखभाल/दुरूस्ती

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : मोहिली आणि नेतीवली येथील जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये विद्युत व यांत्रिकी उपकरणाच्या देखभाल वजा दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी मंगळवारी 15 ऑक्टोबरला सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत कल्याण-डोंबिवली शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

उल्हास नदीकाठच्या मोहिली आणि नेतिवलीतील जलशुध्दीकरण केंद्राकडून कल्याण-डोंबिवलीला पाणी पुरवठा केला जातो. या दोन्ही जलशुध्दीकरण केंद्रांतील विद्युत व यांत्रिकी उपकरणांच्या देखभाल/दुरूस्तीचे काम मंगळवारी केडीएमसीच्या नियंत्रणाखाली ठेकेदाराकडून करण्यात येणार आहे. दुरूस्तीच्या कालावधीत कल्याण शहरासह, कल्याणच्या ग्रामीण भागातील मांडा, टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी, कल्याण पश्चिमेकडे असलेल्या ब प्रभागातील मिलिंदनगर, योगीधाम, चिकनघर, बिर्ला महाविद्यालय परिसर, मुरबाड रस्ता परिसरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर डोंबिवलीच्या पूर्व आणि पश्चिमेचा पाणी पुरवठा या कालवधीत बंद राहणार आहे. दुरूस्तीच्या कामामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी कल्याण शहर, कल्याण ग्रामीणसह डोंबिवलीला कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रहिवाशांनी एक दिवस पुरेल इतका पाणी साठा करून ठेवण्याचे आवाहन केडीएमसीच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT