ठाणे

ठाणे : मराठा आंदोलनकर्ते अन् शिंदे गटात शाब्दिक चकमक

backup backup

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : राजकीय नेत्यांना ठाण्यात प्रवेश बंदी करण्याबरोबरच राजकीय सभा आणि कार्यक्रम घेऊ नये. या मुद्यांवरुन मराठा आंदोलनकर्ते आणि शिंदे गटात शाब्दिक चकमक झाली. 'राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी' संदर्भातील निवेदन द्यायला गेलेल्या मराठा आंदोलक आणि शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.

शहर आणि जिल्हा बंदीच्या मागणीवर नरेश म्हस्के यांनी आक्षेप नोंदवल्याने मराठा आंदोलनकर्ते आणि नरेश म्हस्के यांच्यात काही प्रमाणात वाद झाला. उपोषणस्थावळावर ठाकरे गटाचे नेते राजन विचारे आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड चालतात. मग ठाण्यातील मंत्री आणि राजकीय नेते का नको? असा प्रश्न म्हस्के यांनी उपस्थित केला. तर म्हस्के यांनी आमचे काहीच एकूण घेतले नसल्याचा आरोप मराठा आंदोलनकर्त्यांनी या वेळी केला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरु केले आहे. जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी ठाण्यातही मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामगृह या ठिकाणी साखळी उपोषण सुरु केले आहे. या आंदोलनादरम्यान राजकीय नेत्यांनी गावबंदी करण्यात आली आहे. तर या दरम्यान राजकीय सभा आणि कार्यक्रम घेऊ नये अशी मागणी देखील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची आहे. यासंदर्भातील निवेदन देण्यासाठी ठाण्यातील मराठा कार्यकर्ते शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांना आनंद आश्रम या ठिकाणी द्यायला गेले असता मराठा कार्यकर्त्यांच्या या मागणीवर नरेश म्हस्के यांनी आक्षेप घेतला. यावरून दोघांमध्ये शाब्दिक खटके उडाले.

मराठा आरक्षण आंदोलन आणि उपोषण दरम्यान ठाणे शहरात व जिल्ह्यात कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेत्यांनी मंत्र्यांनी ठाण्यात येऊ नये. तसेच राजकीय, कार्यक्रम, सभा घेऊ नये अशी पत्रकात मागणी केल्याने म्हस्के यांनी कार्यकर्त्यांना केले उलट प्रश्न केले. तुम्हाला तुमच्या व्यासपीठावर खासदार राजन विचारे तसेच आमदार जितेंद्र आव्हाड चालतात, मग ठाण्यातील राजकीय नेते मंत्री तुम्हाला का नको? सर्व पक्षीय आमदार खासदार आणि मंत्री मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सकारात्मक आहेत. मग त्यांना शहरात बंदी का? असे प्रश्न नरेश मस्के यांनी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना विचारले. तर नरेश मस्के आमची मागणी मान्य करत नाही, आमचं मत पूर्ण ऐकून घेतले नाही. आम्हाला बोलू न देता स्वतः राजकीय भाषा वापरत विषय भरकवट असल्याचा आरोप मराठा समाजाकडून करण्यात आला.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT