अवजड वाहतुकीच्या महामार्गावरच मोठ्ठे खड्डेनिर्माण झाल्या ने संभाव्य अपघात घडण्याची शक्यता झाली आहे.  pudhari news network
ठाणे

महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी रॅपीड क्वीक हार्डनर, एम सिक्टी तंत्रज्ञान वापरा - मुख्यमंत्री

नाशिक, अहमदाबाद महामार्गावर पार्किंग लॉटची व्यवस्था; मुख्यमंत्री आज करणार पाहणी

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : रस्त्यावरील खड्डे बुजवून वाहतूक सुरळीत न झाल्यास संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा मंत्र्यांनी देऊनही काही उपयोग झाला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः संबधित अधिकार्‍यांची बैठक घेऊन ठाणे-नाशिक, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करावी. त्यासाठी रॅपीड क्वीक हार्डनर, एम सिक्टी तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना वाहतुक कोंडीतून दिलासा देण्याचे निर्देश राष्ट्रीय महामार्ग, एमएसआरडी, सार्वजनिक बांधकाम, वाहतुक पोलिस विभागाच्या अधिकार्‍यांना दिले. तसेच नाशिक - भिवंडी रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीसाठी युद्ध पातळीवर काम करण्याच्या सूचना देतानाच रस्ते दुरूस्तीच्या कामात हयगय करू नका. पीक अवरमध्ये अवजड वाहतूकीच्या नियमनासाठी कोकण विभागीय आयुक्तांनी एकत्रित अधिसूचना काढावी, अवजड वाहनांसाठी महामार्गालगत पार्कींग लॉट करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे ठाणे, पालघर, नाशिक, रायगड जिल्ह्यातील महामार्गावरील वाहतुक कोंडी, आगामी गणेशोत्सव कालावधीतील वाहतुकीचे नियोजन याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, कोकण विभागीय आयुक्त पी. वेलारासु, जेएनपीटीचे अध्यक्ष उन्मेष वाघ, ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडखे, नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक दिलीप ढोले यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम, परिवहन विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ठाणे, नाशिक, रायगड जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, वाहतुक पोलिस अधिकारी दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

नाशिक- भिवंडी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे वाहतुकीसाठी अडचणी होत आहेत. पावसाळ्यात रस्त्याची अवस्था खराब झाली आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी, अपघात होत आहेत. याची मुख्यमंत्री. शिंदे यांनी गंभीर दखल घेतली असून रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करून ते चांगल्या दर्जाचे आणि जलद गतीने करावे, अशा सूचना दिल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT