सराईत चोरट्याला मध्यवर्ती पोलिसांनी अटक करत अनेक गुन्ह्यांचा पर्दाफाश केला Pudhari
ठाणे

Ulhasnagar Crime | सराईत गुन्हेगाराकडून तीन मोटर सायकल, मोबाईल हस्तगत, तब्बल दहा गुन्ह्यांची उकल

सराईत चोरट्याला मध्यवर्ती पोलिसांनी अटक करत अनेक गुन्ह्यांचा पर्दाफाश केला

पुढारी वृत्तसेवा

Ulhasnagar police bike theft investigation

उल्हासनगर : वाहनाच्या बिघाडाचा फायदा घेत बोनेटवर ठेवलेले मौल्यवान साहित्य लंपास करणाऱ्या सराईत चोरट्याला मध्यवर्ती पोलिसांनी अटक करत अनेक गुन्ह्यांचा पर्दाफाश केला. कौशल्यपूर्ण तपास आणि सतर्क पेट्रोलिंगमुळे आरोपीकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. शहरातील विविध भागांतील गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.       

बदलापूर पश्चिम येथील बेलवली परिसरातील राजलक्ष्मी अपार्टमेंटमध्ये राहणारे जयराम ओटे हे दोन दिवसांपूर्वी सायंकाळच्या सुमारास कल्याण-अंबरनाथ रोडवरून आपल्या कारने जात होते. यावेळी 17 सेक्शन येथे गाडीच्या बोनेटमधून धूर येऊ लागल्याने त्यांनी वाहन थांबवून खाली उतरून पाहणी केली. त्याचवेळी अज्ञात व्यक्तीने बोनेटवर ठेवलेला मोबाईल, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि सुमारे चार हजार रुपयांची रोकड लबाडीने चोरून नेली होती.

याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, पोलीस निरीक्षक तुकाराम पादिर यांनी तपास पथक तयार केले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश शेवाळे, पोलीस अंमलदार प्रमोद जाधव, चंदुलाल शिंदे, अनिल पाटील, कृपाल शेकडे, निलेश नागरे आणि सुशांत हांडे देशमुख यांच्या पथकाने पेट्रोलिंगदरम्यान संशयित आरोपीला ताब्यात घेतले. सखोल आणि कौशल्यपूर्ण चौकशीत आरोपीकडून चोरीस गेलेल्या तीन मोटरसायकली, तीन मोबाईल आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.          

तपासादरम्यान मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन तसेच विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गुन्ह्याची उकल झाली आहे. पुढील तपासात परिमंडळ तीन क्षेत्रात सहा घरफोड्यांमध्येही त्याचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. या यशस्वी कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होणार असून पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT