ठाणे

Ulhasnagar Municipal Corporation : उल्हासनगर महापालिकेत सत्ताधाऱ्यांचा 'क्लीन स्वीप'; सर्व समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड

स्थायी समितीच्या चाव्या कुलवंतसिंग सोहतांकडे

पुढारी वृत्तसेवा

उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीसह नऊ विशेष समित्यांच्या सभापती निवडीवर आज अधिकृत शिक्कामोर्तब झाले. या सर्व पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाली असून, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे (किंवा श्रीकृष पांचाळ) यांनी महापालिका सभागृहात नवनियुक्त सभापतींची अधिकृत घोषणा केली.

नवनियुक्त सभापतींची यादी

महापालिकेच्या विविध समित्यांसाठी पाच दिवसांपूर्वी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. प्रत्येक समितीसाठी केवळ एकच अर्ज प्राप्त झाल्याने ही प्रक्रिया बिनविरोध पार पडली. नवनियुक्त सभापतींची नावे खालीलप्रमाणे आहेत:

  • स्थायी समिती : कलवंत सिंग सोहता (शिवसेना)

  • सार्वजनिक बांधकाम समिती : दीप्ती दुधानी (साई पक्ष)

  • नियोजन व विकास समिती : मीना कौर अजित सिंग लबाना (भाजप)

  • पाणी पुरवठा व जलनिसारण समिती : दीपा नारायण पंजाबी (भाजप)

  • आरोग्य व वैद्यकीय सहाय्य समिती : सविता तोरणे (शिवसेना)

  • माध्यमिक व पूर्व प्राथमिक शिक्षण समिती : साक्षी सुर्वे (शिवसेना)

  • गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती : विपुल मयेकर (भाजप)

  • क्रीडा, समाजकल्याण व सांस्कृतिक समिती : प्रीती विनोद मखिजा (भाजप)

  • महिला व बालकल्याण समिती : मीना दीपक सोंडे (शिवसेना)

  • महसूल समिती : प्रेरणा अजित मखिजानी (शिवसेना)

मान्यवरांकडून अभिनंदन

अधिकृत घोषणेनंतर सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, माजी आमदार पप्पू कलानी, आमदार बालाजी किणीकर, महापौर अश्विनी निकम आणि उपमहापौर अमर लुंड यांनी अभिनंदन केले. यावेळी गटनेते अरुण आशान, राजेश वधारिया यांच्यासह महापालिकेतील विविध पदाधिकारी व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विकासाला गती मिळण्याची अपेक्षा

या बिनविरोध निवडीमुळे महापालिकेच्या प्रशासकीय कारभारात अधिक स्थिरता येण्याची चिन्हे आहेत. आगामी काळात शहरातील रखडलेल्या विकासकामांना गती मिळेल, अशी आशा यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT