उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये विविध ठिकाणी धाड टाकून पोलिसांनी अमली पदार्थांचा साठा जप्त करत ११ जणांना अटक केली. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.२७) पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी, उल्हासनगर झोन चार मधून अमली पदार्थाची विक्री होणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी उल्हासनगरच्या संजय गांधी नगर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत, स्टेशन परिसर, उल्हासनगर स्टेशन परिसर अशा विविध भागात धाडी टाकून अमली पदार्थांचा काही साठा जप्त करत ११ जणांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या धडक करवाईमुळे अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.