हल्लेखोराला अटक करुन नेताना पोलिस 
ठाणे

Ulhasnagar Crime | पूर्ववैमन्यासातून तरुणाला दगडाने मारहाण, गंभीर जखमी

पुढारी वृत्तसेवा

उल्हासनगर :  उल्हासनगर कॅम्प क्रमांक ४ मधील सेक्शन २५ येथील मरियम व्ह्यू अपार्टमेंटजवळ गुरुवारी भल्या पहाटे सकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास एका तरुणावर दगडाने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली. या हल्ल्यात योगेश नगर परिसरात राहणारा रोशन सुरडकर गंभीर जखमी झाला आहे.

    जखमी अवस्थेतील रोशन सुरडकर याला नातेवाईकांनी तातडीने मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला मुंबईतील केईएम रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच तात्काळ विठ्ठलवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत खरात तसेच पोलिस अंमलदार रामदास मिसाळ, दिलीप चव्हाण, चंदू गायकवाड, संतोष सांगळे आणि सागर मोरे यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत राजन गुप्ता याला त्याच्या घरातून अटक केली आहे. या हल्ल्यामागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस पुढील तपास करीत आहेत. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT