ठाणे

Ulhasnagar Crime : उल्हासनगर कॅम्प ४ मध्ये रक्ताचा सडा; भाजप नेत्याच्या कार्यालयाबाहेर तरुणाचा खून, आरोपीला २४ तासांत बेड्या

Ulhasnagar Murder : आरोपीला २४ तासांत बेड्या

पुढारी वृत्तसेवा

उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 येथील कुर्ला कॅम्प चौक परिसरात धारदार शस्त्राने भोसकून सतनाम लबाना ह्या युवकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास घडली होती. पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ हिललाइन पोलिसांच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेत विठ्ठलवाडी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

भाजप नगरसेवक राजेश वानखेडे यांच्या कार्यालया समोरील ट्रान्सफॉर्मर जवळ ही घटना घडली. मयताचे नाव काला उर्फ सतनाम सिंग लबाना असे असून, त्याच्यावर अनिश सिंग लबाना याने धारदार शस्त्राने हल्ला करून वार केल्याने त्याचा मृत्यू झाला. स्थानिकांनी सतनाम याला तात्काळ उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे हे घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, हिललाइन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संग्राम माळकर, पोलिस अंमलदार संदीप बर्वे, मनोज पगारे, दिलीप हायलिंगे, सलीम इनामदार आणि राहुल गायकवाड यांच्या पथकाने तात्काळ हालचाल करत आरोपीला अटक केली. त्यानंतर आरोपीला पुढील तपासासाठी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. जुन्या वादातून हत्या करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. आरोपी अनिश सिंग लबाना याला न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT