ठाणे

Ulhasnagar News : उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग समिती सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल

भाजप आणि शिवसेनेने वाटून घेतल्या समित्या

पुढारी वृत्तसेवा

उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेच्या चार प्रभाग समित्यांच्या सभापतीपदासाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. महायुतीत झालेल्या वाटपानुसार शिवसेना आणि भाजपने प्रत्येकी दोन प्रभाग समित्यांवर दावा करीत उमेदवारी अर्ज भरला आहे. प्रत्येक समितीसाठी फक्त एकच उमेदवारी अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध मानली जात आहे.

उल्हासनगर महापालिका क्षेत्रात चार प्रभाग समित्या आहेत. त्यापैकी प्रभाग समिती चार वगळता कोणत्याही प्रभाग समिती भाजपचे वर्चस्व नव्हते. मात्र असे असले तरी शिवसेनेने प्रभाग समिती एक आणि चार ही भाजपला सोडली. तर तीन आणि चार ही शिवसेनेने स्वतःकडे ठेवली. प्रभाग समिती क्रमांक १ साठी भाजपच्या भावना केशव ओवळेकर, प्रभाग समिती क्रमांक २ साठी शिवसेनेच्या संघमित्रा विशाल हजारे, प्रभाग समिती क्रमांक ३ साठी शिवसेनेच्या संगीता नितीन सपकाळे आणि प्रभाग समिती क्रमांक ४ साठी भाजपच्या सुहाना रवी जेसवानी यांनी उमेदवारी अर्ज दाखल सचिवांकडे सोमवारी (दि. २९) सायंकाळी सादर केले.

यावेळी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महापौर अश्विनी निकम, सभागृह नेते अरुण अशान, उपमहापौर अमर लुंड, भाजपचे गटनेते राजेश वधारिया, महेश सुखरामाणी, जमनादास पुरसवाणी, कमलेश निकम यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येक प्रभाग समितीसाठी एक एकच अर्ज आलेला आहे. प्रत्येक विषयात एकमेकावर टीका करणाऱ्या शिवसेना आणि भाजपने प्रभाग समिती वाटपात जुळवून घेतल्याचे दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT