लॉज छापेमारीत थायलंडच्या 15 तरुणींची सुटका File Photo
ठाणे

Ulhasnagar | लॉज छापेमारीत थायलंडच्या 15 तरुणींची सुटका

पुढारी वृत्तसेवा

ठाणे पुढारी वृत्तसेवा : ठाणे गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे थायलंड देशातून आणलेल्या मुलींकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याच्या माहितीवरून पोलीस पथकाने उल्हासनगर येथे छापेमारी करत १५ थायलंडमधील तरुणी २३ ग्राहक आणि ५.२७ लाखांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

याबाबतची माहिती गुन्हे शाखेचे सहा. पोलीस आयुक्त शेखर बागडे यांनी दिली. ठाणे खंडणी विरोधी पथकाच्या माहितीनुसार बुधवारी पहाटे सव्वा एकच्या सुमारास लॉजमध्ये तीन बनावट ग्राहक पाठवून यशस्वी छापेमारी केली. या छापेमारीत पोलीस पथकाने लॉजमध्ये मॅनेजरसह चार कामगार यांना ताब्यात घेऊ न १५ थायलंड बळीत महिलांची सुटका करण्यात आली आहे.

कारवाई दरम्यान लॉजमधून ५,२७,०००/- रुपये रोख व साधने जप्त करण्यात आली. तर छापेमारीत २३ ग्राहकही ताब्यात घेण्यात आले.

लॉजिंग व बोर्डिंगचे मॅनेजर व तेथे काम करणारे ४ कामगार यांच्या विरुद्ध मध्यवर्ती पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणी विरोधी पथक आणि पोलीस अधिक तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT