Mumbai Pune Expressway Traffic
बदलापूर : बदलापूर शहरातून जाणाऱ्या कर्जत-पुणे महामार्गावर शनिवारी रात्री मोठी वाहतूक कोंडी झाली. रात्री उशिरा वाहतूक कोंडीत आणखी भर पडत गेली. वाहने एका मागोमाग एक अनेक तास एकाच ठिकाणी उभी राहिल्याने एक किलोमीटर पर्यंत वाहनांची रांग लागल्याचे दिसून आले.
यावेळी वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना ताटकळत राहावं लागले. याचा मोठा त्रास त्यांना सहन करावा लागला. शनिवार रविवार वीकेंडचा दिवस असल्याने बदलापूर कर्जत पुणे महामार्गावर वीकेंड एन्जॉय करण्यासाठी नागरिक घराबाहेर पडले होते. त्यामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याचं समोर येत आहे.