Titwala Drunk Driving Action Pudhari
ठाणे

Titwala Drunk Driving Action: टिटवाळ्यात 'ड्रंक अँड ड्राईव्ह' विरोधात पोलिसांचा बडगा; ९ मद्यधुंद चालकांवर कारवाई

संबंधित प्रकरणे न्यायालयात दाखल करण्यात आली असून न्यायालयाच्या आदेशानुसार चालकांना दंड व अन्य शिक्षांना सामोरे जावे लागणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

टिटवाळा: रस्ते अपघात रोखण्यासाठी टिटवाळा वाहतूक पोलिसांनी मद्यधुंद वाहन चालकांविरोधात विशेष मोहीम हाती घेत कठोर कारवाई केली. या मोहिमेदरम्यान दारूच्या नशेत वाहन चालविताना आढळलेल्या ९ चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांची ९ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

वाहतूक शाखेच्या पथकाने विविध ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. तपासणीदरम्यान मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणारे चालक आढळून आल्यानंतर त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. संबंधित प्रकरणे न्यायालयात दाखल करण्यात आली असून न्यायालयाच्या आदेशानुसार चालकांना दंड व अन्य शिक्षांना सामोरे जावे लागणार आहे.

दारू पिऊन वाहन चालविणे हे गंभीर स्वरूपाचे वाहतूक उल्लंघन असून त्यामुळे स्वतःसह इतर नागरिकांच्याही जीवितास धोका निर्माण होतो. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे आणि मद्यप्राशन केल्यानंतर वाहन चालविणे टाळावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. भविष्यातही अशा प्रकारच्या विशेष मोहिमा सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT