इलेक्ट्रिक स्कूटरला लागलेली आगीवर नियंत्रण मिळवताना अग्नीशमन दलाचे कर्मचारी Pudhari Photo
ठाणे

डोंबिवलीच्या कोपर पुलावर द बर्निंग स्कूटरचा थरार

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : डोंबिवलीच्या पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या मध्य रेल्वे मार्गावरील कोपर पुलावर एका इलेक्ट्रिक स्कूटरला अचानक आग लागली. ही घटना शुक्रवारी (दि.4) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. धावत्या स्कूटरच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने या स्कूटरवरील चालक थोडक्यात बचावला आहे. ही आग बॅटरीच्या स्फोटामुळे लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आग लागल्याची माहिती कळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. स्कूटरला आग लागल्याचे पाहताच पुलावरून धावणाऱ्या अन्य वाहनांचा वेग कमी करून वाहनचालकांनी खबरदारी घेतली. अग्निशमक दलाच्या जवानांनी काही वेळातच स्कूटरला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र या आगीत नवी कोरी स्कूटर पूर्णतः भस्मसात झाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT