युवासेना pudhari file photo
ठाणे

ठाणे : मुख्यमंत्र्यांसाठी युवा सेना मैदानात उतरणार

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाची युवासेनाही आता कामाला लागली आहे. शाखा शाखांमध्ये संपर्क अभियान राबवण्याबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहचवण्याचा निर्णय युवासेनेच्या वतीने घेण्यात आला आहे. गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्र्यांनी युवासेनेला ताकद दिली आहे, आता त्यांच्यासाठी युवासेनेने मैदानात उतरले पाहिजे, असे आवाहन युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले आहे.

युवासेना ठाणे लोकसभा क्षेत्रातील युवासेना पदाधिकारी आणि युवासैनिकांची अत्यंत महत्त्वाची बैठक युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे येथील अनंत बँक्वेट्समध्ये पार पडली. या बैठकीत पक्ष संघटन आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने युवा सैनिकांना मार्गदर्शन करण्यात आले. पुर्वेश सरनाईक यांनी उपस्थितांशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीत ठाण्यातून खासदार नरेश म्हस्के यांना सर्वाधिक लीड मिळवून देण्यात युवासेनेचे मोठे श्रेय आहे. विधानसभेच्या निवडणुका येत आहेत. मागील अडीज वर्षे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील प्रत्येक भागाचा विकास केला. मुख्यमंत्री 18-18 तास काम करतात. अडीच वर्षे त्यांनी आपल्याला ताकद दिली. आता त्यांच्यासाठी प्रत्येक युवा सैनिकांनी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले पाहिजे, असे आवाहन युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी युवा सैनिकांना केले आहे.

युवासेना ठाणे लोकसभा अध्यक्ष नितीन लांडगे, विराज निकम, युवासेना कोअर कमिटी सदस्य स्वप्निल लांडगे, सिद्धार्थ पांडे, सिद्धेश अभंगे, युवासेना ठाणे विधानसभा अध्यक्ष जितेश गुप्ता, ओवळा माजीवडा विधानसभा अध्यक्ष देवेंद्र साळवी, कोपरी पाचपाखाडी विधानसभा अध्यक्ष ऋषिकेश माने, युवतीसेना कोअरकमिटी सदस्य पुजा लोंढे, क्षितिजा कांबळे, श्वेता सुयोग व श्वेता म्हात्रे त्याचसोबत युवासेना पदाधिकारी व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT