डेंग्यू  file photo
ठाणे

ठाणे : डेंग्यूच्या आजाराने तरुणाचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

नेरळ : डेंग्यू सदृश आजाराने नेरळ येथील एका २५ वर्षीय उच्चशिक्षित व ऍडव्हॉकेट सनद प्राप्त तरुणाचा डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाला आहे. सदर तरुणाचे नांव मुस्तफा उर्फ राजू रफिक अत्तार असे आहे. नेरळ शहरात तरुणाचा डेंग्यूसदृश्य आजारांनं मृत्यू झाल्यानं आरोग्य विभाग खडबडून जागा झाले आहे.

नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील जुना बाजारपेठ येथील राहणारे नामांकित व्यक्ती रफिक अत्तार यांचा २५ वर्षीय मुलगा मुस्तफा उर्फ राजू रफिक अत्तार हा गेली काही दिवस ताप, अंग दुखी आजाराने पीडित होता.

वडील रफिक अत्तार यांनी मुस्तफाला नेरळ शहरातीलच एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र मुस्तफाच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने, तर १२ सप्टेंबर रोजी डेंग्यू व पेशी संदर्भातील रक्त तपासणी केली असता, डेंग्यूचे निदान समोर आल्याची माहिती समोर आली आहे. तर आठ दिवस उलटूनही मुस्तफाच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने व १३ सप्टेंबरच्या दिवशी अचानक मुस्तफाची प्रकृती खालवल्याने त्याला नेरळ येथून बदलापूर येथे रुग्णवाहिकेतून नेत असताना रस्त्यातच त्याची प्राणजोत मालवली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT