ठाणे

Thane Crime News : कल्याणमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेचा खून

अविनाश सुतार

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका 36 वर्षीय प्रेयसीची तिच्या जोडीदाराने चाकूने सपासप वार करून हत्या केल्याचे आज (दि.६) उघडकीस आले. कल्याणच्या पूर्वेकडील विजयनगर-आमराई परिसरात एकच खळबळ माजली आहे. रसिका कोलंबेकर ( वय 36) असे मृत महिलेचे नाव आहे. तिला संपविणाऱ्या खुनी विजय जाधव (वय 48) याला कोळसेवाडी पोलिसांनी अवघ्या काही तासांतच अटक केली आहे. रसिका आणि विजय हे दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. विजय हा रसिकाच्या चारित्र्यावर संशय घेत असे. त्यामुळेच वारंवार त्या दोघांमध्ये वाद होत होते. याच वादातून आज विजयने रसिकावर चाकूने वार करत तिची राहत्या घरात निर्घृणपणे हत्या केली. (Thane Crime News)

पूर्वेकडे विजयनगर (आमराई) परिसरात विजय व रसिका हे दोघे गेल्या काही महिन्यांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. काही दिवसांपासून विजय हा रसिकाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असत. आज सकाळी दहाच्या सुमारास विजय आणि रसिका यांच्यात पुन्हा अशाच कारणावरून वाद उफाळून आला. संशयाचे भूत मानगुटीवर बसलेल्या विजयने संतापाच्या भरात रसिकाच्या सर्वांगावर चाकूच्या साह्याने सपासप वार केले. या हल्ल्यात रसिका रक्ताच्या थारोळ्यात तडफडून गतप्राण झाली. रसिका निस्तेज पडलेली पाहून विजयने तेथून पळ काढला. (Thane Crime News)

या प्रकाराची माहिती कळताच कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर रसिकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या रूक्मिणीबाई हॉस्पिटलला पाठवून दिला. वरिष्ठ पेलिस निरिक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली खास पथकाने तपास चक्रांना वेग देऊन रसिकाचा खुनी विजय जाधव याचा शोध तात्काळ घेऊन त्याला अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी विजयच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT