ठाणे : चेंबूरमधील आगीची घटना ताजी असतानाच आता वंदना बस डेपो जंक्शनच्या संपूर्ण परिसरात पांढऱ्या धुराचे लोट पसरले आहे. ड्रेनेजला लागून असलेल्या केमिकल इंडस्ट्रियल स्मॉल स्केल युनिटला लागलेल्या भीषण आगीमुळे (Chemical Fire) हे धुराचे लोट पसल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने केमिकल ड्रमचा स्फोट झालेला नसल्याने कोणतीही जिवितहानी झालेली नाही. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.