पशुंचे लसीकरण अभियान
साथीचे आजार रोखण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या पशु संवर्धन विभागाकडून पावसाळापूर्व लसीकरण  pudhari news network
ठाणे

Thane |साथरोग रोखण्यासाठी साडेचार लाख पशूंचे लसीकरण

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : शेती क्षेत्रात पशूंचे असणारे महत्व लक्षात घेऊन पावसाळ्यात प्रादुर्भाव होणार्‍या साथीच्या रोगांपासून संरक्षण करण्यासाठी तसेच साथीचे आजार रोखण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या पशु संवर्धन विभागाकडून जिल्ह्यातील 4 लाख 66 हजार 450 पशूंचे पावसाळापूर्व लसीकरण करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील पशुधन असे...

  • गायी म्हशी - 1,75,947

  • शेळ्या मेंढ्या - 63,334

  • एकूण - 2,39,281

पावसाळ्यात पशूंना विविध साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होण्याची भीती असते. या प्रादुर्भावामुळे अनेकदा जनावरांचे मृत्यू होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून मोठ्या प्रमाणावर लसीकरण राबविण्यात आले. पशुधनाला घटसर्प व फर्‍या, घटसर्प, फर्‍या, आंत्रविषार, लम्पी चर्म रोग, लाळ खुरकत रोग, पीपीआर प्रतिबंधक लस टोचण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. 1 एप्रिल पासून हे लसीकरण अभियान सुरू करण्यात आले होते. लसीकरण अभियानात पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, पशुधन विकास अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षकांनी भाग घेतला.

रोग लसीकरण

  • घटसर्प-फर्‍या 40,050

  • घटसर्प 56,000

  • फर्‍या 28,000

  • लम्पी 63,600

  • आंत्रविषार 39,500

  • लाळ खुरकत 1,77,200

  • पीपीआर 62,100

  • एकूण 4,66,450

घरोघरी जाऊन लसीकरण

जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. समीर तोडणकर यांच्या नेतृत्वाखाली 21 पशुधन विकास अधिकारी, 33 पशुधन पर्यवेक्षक आणि पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी घरोघरी जाऊन जिल्ह्यातील पशुधनाचे लसीकरणाचे काम पूर्ण केले.

SCROLL FOR NEXT