Illegal Alcohol Raid Uttan
ठाणे : नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सतर्क झाले असून त्यांनी उत्तनच्या मुर्धा खाडी मिठागराजवळ अवैधरित्या हातभट्टीची दारू निर्मिती आणि विक्री होत असलेल्या ठिकाणावर छापा घालून १० लाख किंमतीची हातभट्टीची दारू आणि रसायन नष्ट केले. याप्रकरणी बोट जप्त करण्यात आली असून दोन गुन्हे दाखल केले आहे.
भाईंदर येथील मुर्धा खाडी मिठागराजवळ अवैध हातभट्टीच्या दारूची विक्री आणि निमिर्ती होत असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार २०नोहेंबररोजी पथकाने छापा घालून हातभट्टी उद्ध्वस्त केली.
त्यावेळी १४०० लिटर गावठी दारू आणि १९ हजार रसायन, एक प्लास्टिक बोट जप्त केली. त्यातील दारू आणि रसायन जागीच नष्ट करण्यात आले आहे. ही कारवाई पुढे सुरूच राहणार असून नागरिकांनी अवैध मद्य विक्री, निर्मिती किंवा वाहतुकीबाबत तक्रार करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे टोल फ्री क्र. १८००८३३३३३३/ १८००२३३९९९९ जाणीव व्हाट्सअप ८४२२००११३३ येथे संपर्क साधण्याचे आवाहन केले.