गॅस सिलिंडर गोदाम file photo
ठाणे

ठाणे : अनधिकृत गॅस सिलिंडर गोदामावर छापा

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी : भिवंडीतील गोरसई भिनार परिसरातील एका पत्र्याच्या गोदामात असुरक्षितपणे साठवणूक केलेल्या गॅस सिलिंडर गोदामावर शिधा वाटप कार्यालयाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने केलेल्या कारवाईत 13 टेम्पोत 1139 भरलेले सिलिंडर तर 429 रिकामे सिलिंडर असा एकूण 68 लाख 42 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात 31 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅस साठवणूक करण्याचा कोणताही परवाना नसताना या ठिकाणी पत्र्याच्या गोदामात गॅस सिलिंडरचा साठा करून ठेवल्याची माहिती राज्यस्तरीय शिधा पथकाला मिळाली होती, त्यानुषंगाने सहाय्यक नियंत्रक शिधावाटप अधिकारी विनायक निकम यांनी शिधावाटप नियंत्रकांच्या पथकासह घटनास्थळी छापा मारला. येथे 13 वेगवेगळ्या टेम्पोमध्ये 5 किलो वजनाचे 706 तर 19 किलो वजनाचे 433 असे एकूण 1139 गॅस भरलेले तर 5 किलो वजनाचे 286 व 19 किलो वजनाचे 143 असे एकूण 429 रिकामे गॅस सिलिंडर आढळून आले.

याप्रकरणी पुरवठा अधिकारी नायब तहसीलदार दत्तात्रेय बांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून भिवंडी ग्रामीण तालुका पोलीस ठाण्यात किशोर मोरे, संजय कुमार गौंड, मोहम्मद इक्राम, इरफान इकबाल मोमीन, आझाद खान यांसह इतर 26 जणांवर अत्यावश्यक वस्तू अधिनियम व तरल पेट्रोलियम गॅस (आपूर्ति व वितरण) कायद्यान्वये सर्व मुद्देमाल सीलबंद करून एकूण 31 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास तालुका पोलीस करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT