मुंबई नाशिक महामार्गावर विकेंडला वाहतुक कोंडी झाली असून वाहनचालक आणि पर्यटकांना वाहतूक कोंडील सामोरे जावे लागत आहे.  Pudhari News network
ठाणे

Thane | मुंबई नाशिक महामार्गावर पुन्हा ट्रॅफिक जाम; विकेंडला पर्यटकांचा हिरमोड

दोन तासापासून नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागतेय

पुढारी वृत्तसेवा

कसारा : शाम धुमाळ

मुंबई नाशिक महामार्गावर रविवार (दि.5) आज सकाळी 7 वाजे पासून वाहतूक कोंडी झाली असून 2 तासापासून नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. मुंबई नाशिक महामार्गांवरील जुन्या कसारा घाटातील वाहतूक कोंडी सुटता सुटत नाही. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांची दमछाक होत असून काही बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतूक सुरळीत होण्यास वारंवार व्यत्यय येत आहे.

रविवार (दि.5) पहाटेच्या सुमारास जुन्या कसारा घाटातील झिरो पॉईंट वळणावर एक कंटेनर पलटी झाला. कंटेनर पलटी झाल्याने एकेरी वाहतूक सुरु असतानाच एक मालवाहू ट्रक रस्त्यात बंद पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. त्यामुहे वाहतूक कोंडी झाल्याने आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी जव्हार फाटा येथे पोहचले. त्यांनी महामार्ग पोलिसांच्या मदतीने छोटी वाहने पर्यायी रस्त्याने वळवण्याचा प्रयत्न केला. परंतु काही बेशिस्त वाहन चालकांमुळे ओव्हरटेकच्या घाईगडबडीमुळे येथील रस्ता पण जाम झाला.

रविवार (दि.5) असल्याने प्रचंड गर्दी लक्षात घेता शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांनी कसारा पोलिसांना सूचना करीत वाहतूक कोंडी सोडविण्याचे त्वरीत आदेश दिले. कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुनील गावीत यांनी कसारा घाटात पोलीसांची कुमक पाठवून महामार्ग पोलीस घोटी केंद्र, आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्य यांच्यासोबत मदत कार्य सुरु केले. तर रस्त्यात बंद पडलेला ट्रक व पलटी झालेला कंटेनर बाजूला घेण्यासाठी क्रेनच्या मदतीने टोल पेट्रोलिंग प्रयत्न करीत आहेत. दरम्यान सकाळी 7 वाजेपासून वाहनचालक, विकेंडचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडलेल्या पर्यटकांना वाहतूक कोंडीमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुंबईहून नाशिककडे जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. माया मार्गावर 2 किलोमीटर पर्यंत रांगा गेल्या असून ट्रॅफिक सुरळीत करण्यासाठी कसारा पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, महामार्ग पोलीस, घोटी, आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य तब्बल 2 तास मेहनत घेत आहेत.

कसारा घाटातील झिरो पॉईंट वळणावर कंटेनर पलटी झाल्याने वाहतूक कोंडी झाली.

वाहतूक कोंडीमुळे विकेंडच्या आनंदावर पाणी

मुंबईहून नाशिककडे जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून विकेंडला सुट्टीची मजा अनुभवण्यासाठी बाहेर पडलेल्या पर्यटाकंना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याने त्यांचा अशरक्ष: हिरमोड झाला आहे. प्रमाणापेक्षा जास्त झालेल्या वाहनांमुळे आणि काही बेशिस्त वाहनचालकांमुळे संपूर्ण विकेंडला शहरात वाहतूक व्यवस्थेचा अक्षरश: बोजवारा उडाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT