Passenger Protest Titwala Pudhari
ठाणे

Titwala Railway Block | टिटवाळ्यात रेल्वेच्या मेगाब्लॉकने प्रवासी वेठीस; संतप्त प्रवाशांचा स्टेशन मास्तर कार्यालयाला घेराव

रेल्वे प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी

पुढारी वृत्तसेवा

Passenger Protest Titwala

डोंबिवली :
कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील टिटवाळा स्थानकात सुरू असलेल्या १५ दिवसांच्या मेगाब्लॉकचा फटका आता थेट प्रवाशांच्या संतापातून बाहेर पडू लागला आहे. लोकल गाड्या तासन् तास उशिरा धावत असल्याने शुक्रवारी टिटवाळा स्थानकात प्रवाशांचा संयम सुटला आणि संतप्त प्रवाशांनी थेट स्टेशन मास्तर कार्यालयाला घेराव घालून रेल्वे प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

प्लॅटफॉर्म तुडुंब...डब्यात पाय ठेवायला जागा नाही
सकाळच्या पीक अवर्समध्ये टिटवाळा स्थानकात प्लॅटफॉर्मवर पाय ठेवायला जागा नसल्याचे चित्र दिसत होते. गाडी येताच डब्यात चढण्यासाठी प्रवाशांची अक्षरशः झुंबड उडत होती. अनेक प्रवाशांना गाडीत चढताच येत नसल्याने त्यांना पुढच्या गाडीची वाट पाहत फलाटावरच ताटकळत उभे रहावे लागले.

लोकल अभावी मेल-एक्स्प्रेसमध्ये जीवघेणी गर्दी
लोकल सेवा पूर्णपणे कोलमडल्याने नोकरदार वर्गाने नाईलाजास्तव लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये घुसखोरी सुरू केली. त्यामुळे एकमीडे एक्स्प्रेस गाड्यांनाही लोकलसारखीच गर्दी झाली होती. तर दुसरीकडे स्थानकावर एकच गोंधळ उडाला होता. याचा सर्वाधिक फटका महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांना बसला. रोजच्या या मन:स्तापाला कंटाळलेल्या प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉकचे नियोजन तातडीने बदलावे आणि लोकलचे वेळापत्रक सुरळीत करावे, अशी मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT