कल्याणचा स्कायवॉक झालाय चोर, गर्दुल्ल्यांचा अड्डा pudhari file photo
ठाणे

ठाणे : कल्याणच्या ‘स्कायवॉक’वर फेरीवाल्यांचा वेढा कायम

पुढारी वृत्तसेवा
सापाड : योगेश गोडे

कल्याणच्या विविध भागातून येणार्‍या नागरिकांना रेल्वे स्थानक परिसरात स्कायवॉकची उभारणी करण्यात आली आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून हे स्कायवॉक पादचार्‍यांसाठी बांधलेत की फेरीवाल्यांसाठी असा प्रश्न पडू लागला आहे. या स्कॉयवॉकवर फेरीवाले, वेश्या आणि भिकार्‍यांचा अहोरात्र वावर असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना स्कायवॉकवरून चालणे देखिल असह्य झाले आहे.

स्कायवॉक नागरिकांच्या सोईकरीता मोकळे करून देण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे. परिणामी स्काय वॉक हे पादचार्‍यांसाठी बांधलेत की फेरीवाल्यांसाठी असा प्रश्न पडू लागला आहे.

कल्याणच्या विविध भागातून येणार्‍या नागरिकांना रेल्वे स्थानक परिसरात स्कायवॉकची उभारणी करण्यात आली आहे. लोकल गाडीतून प्रवास करणार्‍या प्रवाशांना स्कायवॉक चालण्यासाठी सोईस्करपणे असल्यामुळे बहुतेक प्रवाशी वाहनांच्या गर्दीतून प्रवास करण्यापेक्षा स्कायवॉकचा वापर मोठ्या प्रमाणात करतांना दिसत आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून हे स्कायवॉक पादचार्‍यांसाठी बांधलेत की फेरीवाल्यांसाठी असा प्रश्न पडू लागला आहे. या स्कॉयवॉकवर फेरीवाले, वेश्या आणि भिकार्‍यांचे बस्तान अहोरात्र मांडून बसत असल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना स्काय वॉक वरून चालणे देखील जिकरीचे झाले आहे. गर्दुल्ले आणि लुटारू यांच्यामुळे स्कायवॉकवरून प्रवास करणार्‍या नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.

कचर्‍याचे ढिगारे, अनधिकृत विक्रेते, वारांगना, भिकारी आणि गर्दुल्ल्यांंचा वेढा, यामुळे कल्याण स्कायवॉकला बकाल बनवत आहे. पादचार्‍यांच्या सुरक्षेसाठी महापालिकेने स्कायवॉकवर सुरक्षा रक्षक नेमले पाहिजेत. स्कायवॉकवर कोणत्याही प्रकारची अनधिकृत दुकाने नसावीत. स्कायवॉकवर साचलेले कचर्‍याचे ढिगार, लाल पिचकार्‍यांनी माखलेल्या स्कायवॉकच्या ग्रील ह्या तत्काळ स्वच्छ करून टाकावेत. स्टेशन परिसरातील वाहनतळ व रिक्षा स्टॅण्डजवळ भिकार्‍यांचा आणि देह विक्री करणार्‍या महिलांचा अड्डा बनत चालला आहे. पोलिसांचा याकडे दुर्लक्ष होत आहे. वाहतूक पोलिसांच्या कृपेमुळे स्टेशन परिसरात आजही रिक्षा कोठेही कशाही उभ्या असतात. याकडे प्रशासनाने अधिक लक्ष घालण्याची आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT