मुलीवर अत्याचार Pudhari File Photo
ठाणे

ठाणे : कोवळ्या मनावरील आघात संपता संपेना! नालासोपार्‍यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पुढारी वृत्तसेवा

नालासोपारा : नालासोपार्‍यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्या अश्लील फोटोंच्या आधारे धाक दाखवून 25 हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी एका तरुणीसह दोघांवर पोक्सो, आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला.

पीडित मुलीची एका 26 वर्षांच्या तरुणीशी ओळख झाली होती. त्यानंतर 2023 मध्ये या तरुणीने पिडीत मुलीची एका 24 वर्षांच्या तरुणाशी ओळख करून दिली. त्यानंतर 24 वर्षांच्या या तरुणाने मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. त्याचवेळी त्याने या मुलीची अश्लील छायाचित्रे काढून ओळख करून देणार्‍याला पाठविली. त्यावेळी त्याने ही छायाचित्रे समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्या मोबदल्यात तिच्याकडून 25 हजार 500 रुपये उकळले. तिने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर एका आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT