जागतिक जल दिनाचे औचित्य साधून पाण्याचे महत्त्व आणि त्यानुसार पाणी वापर याविषयी जनजागृतीसाठी डोंबिवलीमधील एमआयडीसी भागात भव्य जल सुरक्षा दिंडी काढण्यात आली.  ( छाया : बजरंग वाळुंज)
ठाणे

ठाणे : डोंबिवलीत जल सुरक्षा दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद

11 संस्था-संघटनांसह विद्यार्थ्यांचा सहभाग

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (पर्यावरण विभाग) यांच्या सहकार्याने, तसेच मिलापनगर रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन, सुदर्शन नगर निवासी संघ, शिवाई बालक मंदीर शाळा, के. रा. कोतकर माध्यमिक विद्यालय तथा ज्ञानमंदीर शाळा, एव्हरग्रीन सायकल प्रेमी ग्रुप, पर्यावरण दक्षता मंडळ, ऊर्जा फाउंडेशन, श्री लक्ष्मीनारायण संस्था आणि विवेकानंद सेवा मंडळ (स्वच्छ डोंबिवली अभियान) यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि.21) जागतिक जल दिनाचे औचित्य साधून पाण्याचे महत्त्व आणि त्यानुसार पाणी वापर याविषयी जनजागृतीसाठी डोंबिवलीमधील एमआयडीसी भागात भव्य जल सुरक्षा दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी निघालेली जलदिंडी शिवाई बालक मंदिर शाळा, निवासी बस स्टॉप, लक्झुरिया बिल्डिंग रस्ता, श्री गणेश मंदिर, शिवप्रतिमा हॉल, शिवाई बालक मंदिर शाळा, के. रा. कोतकर माध्यमिक विद्यालय, कावेरी चौक, सुदर्शन नगर उद्यान, साईबाबा मंदिर, आजदेतील औदुंबर कट्टा, सिस्टर निवेदिता शाळा, चतुरंग बिल्डिंग, मिलापनगर बस स्टॉप, ओंकार शाळेकडून आलेली ही दिंडी के. रा. कोतकर माध्यमिक विद्यालयाजवळ विसर्जित करण्यात आली. या दिंडीमध्ये शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

पाणी वाचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. पाण्याच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यास मदत करा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले होते. जलदिंडी आयोजनासाठी सुरेखा जोशी, वर्षा महाडिक आणि हर्षल सरोदे आदींनी सहभाग घेतला.

जलदिंडी आयोजनासाठी सुरेखा जोशी, वर्षा महाडिक आणि हर्षल सरोदे आदींनी सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT