शाम धुमाळ, कसारा : हर घर नळ! असे म्हणत नळाव्दारे मुबलक पाणी पुरवठा हाेत असल्याची जाहिरात बाजी काही महिन्यांपूर्वी करण्यात येत होत्या मात्र या जाहिराती केवळ फसव्या असल्याचे शहापूर तालुक्यातील तीव्र पानी टंचाई मूळे स्पष्ट झाले आहे .
मुंबई,सारख्या माेठ्या महानगरांना पाणी पुरवठा करनाऱ्या भातसा, तानसा, वैतरणा सारखी धरणे शहापूर तालुक्यात असताना आज मितीस शहापूर तालुक्यातील ग्रामस्थ मात्र स्वत: तीव्र पाणी टंचाईला ताेंड देत आहेत. यंदा अन्य वर्षांच्या तुलनेत मात्र पाणी टंचाई अधीक तीव्र झाल्यामुळे गांवापाड्यातील रहिवाशी त्रस्त आहेत. शहापूर तालुका सध्या तीव्र पाणी टंचाईला ताेंड देत आहे.
शेकडो गांवपाड्यांमध्याील् हजारो ग्रामस्थांना पाणी टंचाईच्या झळा साेसाव्या लागत आहे शहापूर तालुका हा मुबई सह ठाणे शहारांना पाणी पुरवठा करणारा तालुका म्हणून प्रसिध्द आहे. यंदा या तालुक्यातील ४५ माेठे गांवे आणि १५० आदिवासी पाडे आदी १९५ गांवपाडे यंदाच्या उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईला ताेंड देत आहे. यंदाचा उन्हाळा कडक असल्यामुळे त्यांचा त्याचा पारा ४० अंशाच्या खाली येत नसल्यामुळे पाणी समस्या गंभीर झाली आहे.
शहापूर तालुक्यातील सुसरवाडी गावात तर पिण्याच्या पाण्यासाठी एका महिलेला ४ ते ५ तास हंडा कळशी घेऊन उभे रहावे लागत आहे गावात असलेल्या विहिरीत डबके असल्या सारखे पाझरते पाणी आहे हे पाणी भरण्यासाठी एक हंडा भरण्यासाठी एका व्यक्तीला अर्धा तास लागतो सकाळ पासून नंबर ला भांडी ठेवत या गावातील ग्रामस्थ महिला नंबर प्रमाणे पाणी भारत असतात. विहिरीत टाकलेला पोहऱ्यात अर्धेच पानी येते ते अर्धे अर्धे पानी हड्यात ओतून तो हंडा भारतात अर्धा तासाच्या वर एका हड्यासाठी वेळ लागत असल्यामुळे या गावातील लोक रात्री उशिरा पर्यत विहिरीवर पानी भारत असतात.
अक्षरशः हृदय पिळवटून टाकणाऱ्या या पाणी टंचाई मूळे गावातील लोक हैराण झालेत असून या गावात कागदोपत्री झालेल्या पानी योजना प्रत्येक्षात मात्र कार्यान्वित नाहीत दरम्यान सुसरवाडी सह. फुगाळे, दांड, कळभाेंडे, काेथळे, माळ, वहिगांव, उमरावणे, उंबरखांड, पेंढाळघाेळ, पिपळपाडा, पेंढरी, पळशीण, शीळ, यासह कसाऱ्या जवळील अनेक पाड्यात पाणी त्यांचाईच्या तीव्र झळा पहावयस मिळत असून भातसा धरण पात्रा पासून काही किमी अंतरावर असलेल्या सुसरवाडी गावातील लोकांना अनेक दिवसापासून पाणी मिळत नसल्याने गावापासून दुरवर् असलेल्या एका पाझर विहिरीवर एका हंद्यासाठी अर्धा ते एक तास उभे राहून अर्धा अर्धा पोहऱ्याने पाणी काढायची वेळ गावाकऱ्यांवर आली आहे.
एकी कडे गावाकऱ्यांना प्यायला पाणी नसल्याने ग्रामस्थ डोक्यावर हंडा कळशी घेत पाण्यासाठी भटकंंती करीत असून गावात असलेली जनावरे देखील पाण्याविना तडफडून मृत होत आहेत.दरम्यान राज्यकर्त्यांनो तुमचे राजकारण संपले असेल तर आमच्या पाण्यासाठी प्रयत्न करा असा टाहो ग्रामस्थ फोडीत आहेत.