दिवा : दिव्यात पाणीसंकटाचा वर्षानुवर्षे सातत्याने दिवावासीय सामना करीत आहेत. पाणी हे जिवन या संकल्पनेनुसार अनेकवर्ष दिवावासीय पालिकेच्या भोंगळ आणि दुर्लक्षित कारभाराचे फलित भोगत आहेत. तर 5 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या दिव्यातील समस्यांचे निकरण न झाल्याने 21 व्या शतकातही दिवावासी जिवन (पाणी) विकत घेताहेत अशी दयनीय स्थिती आहे. हा गंभीर प्रश्न नेमका कधी सुटणार अशी मागणी नागरिक करत आहेत.
दिवसेंदिवस दिव्यातील लोकसंख्या लाखोंच्या घरात पोहचली आहे. किंबहुना दिवासीयांना मूलभूत सुविधांसाठीही वणवण भटकंती करावी लागत आहे. ठाण्याचे उपमहापौर दिव्यातून मिळाले. मात्र दिव्याचा विकासचं झाला नसल्याचे चित्र आहे. दिवा हे आजच्या स्थितीला नागरी समस्यांचे आगार झाले आहे. पोलीस ठाणे कोसो दूर, पाण्याची उन्हाळा असो कि पावसाळा भीषण टंचाई, ठाणे पाणी वितरणाची कुचकामी व्यवस्था, वाहतुकीच्या तीन-तेरा विविध मूलभूत आणि शहर बनण्याकडे वाटचाल करणार्या दिव्यात सुविधांचा वानवा आहे. पाण्यासाठी अनेक आंदोलने झाले. पाणी वितरण व्यवस्था अकार्यक्षम दिव्याला पाणीपुरवठा करणायचा दावा ठाणे पालिका पाणीपुरवठा विभाग करीत आहेत.
दिव्यातील नागरिकांना पाणीपुरवठा होण्यासाठी 2012 पूर्वी दोन जलकुंभ बेतवडे येथे बांधण्यात आले. मात्र या जलकुंभातून पाणीपुरवठा न होताच हे बंद स्थितीत आहेत. चुकीचे नियोजन करणार्या अधिकारी व ठेकेदार यांच्यावर या संदर्भात काय कारवाई झाली असा प्रश्नही ज्योती पाटील यांनी विचारला आहे. भर पावसात पाणीटंचाई नागरिकांना भेडसावत असेल तर याचा जाब विचारावाच लागेल असेही ज्योती पाटील यांनी सांगितले. बनविलेल्या एक जलकुंभ गळती लागलेली आहे.त्यामुळे मिळणारे अतिरिक्त पाणी साठवणूक करता येत नाही. तर दुसरा जलकुंभाची स्टोरेज टँक बनविण्यात न आल्याने तोही निकामी अथार्त आहे असल्याच्या नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत.
दिव्यातील पाणी समस्येने येथील अनेक नागरिक त्रस्त आहेत अनेकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने टँकरने पाणी विकत घ्यावे लागते टँकर माफियांना पाणी मिळते मात्र लोकांना पाणी मिळत नाही दिव्यात अंतर्गत जलवाहिन्या न टाकल्या गेल्याने अनेक भागात पाणीटंचाई आहे अनेक भागात पाण्याच्या लाईन महागड्या दराने सोसायटी यांना विकले जाते. पण सर्वसामान्य नागरिकांना महापालिकेच्या पाण्याच्या लाईन मधून पाणी मिळत नाही हे चित्र बदलायला हवे महापालिकेने दिव्यातील पाणी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करायला हवाज्योती पाटील, उबाठा महिला अध्यक्ष व संघटिका