उच्च दाब वीज वाहिनीच्या पर्यायावर महिनाभरात तोडगा काढण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले Pudhari News network
ठाणे

Thane | नवीन ठाणे रेल्वेस्थानकाच्या शेजारील उच्चदाब वीजवाहिनी महिनाभरात हटवा

महापालिका आयुक्तांचे महावितरणला निर्देश; कामाची केली पाहणी

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : ठाणे-मुलुंड दरम्यान होत असलेल्या नवीन रेल्वे स्थानकांच्या शेजारील उच्च दाब वीज वाहिनीच्या पर्यायावर महिनाभरात तोडगा काढण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. नवीन विस्तारित रेल्वे स्थानका शेजारी ही उच्च वीज वाहिनी असून यामुळे रेल्वे स्थानकाच्या कामात अडथळा येऊ नये यासाठी महिनाभरात यावर पर्यायी तोडगा काढण्याचे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत.

ठाणे आणि मुलुंड दरम्यान मनोरुग्णालयाच्या लगत ठाणे स्मार्ट सिटीतंर्गत नवीन रेल्वे स्टेशन बांधण्यात येत आहे. यामध्ये रेल्वे परिचलन क्षेत्रामधील ट्रॅक बांधणे, रेल्वे स्टेशन इमारत बांधकाम बांधणे आदी अनुषंगिक कामे रेल्वेकडून तर,परिचलन क्षेत्राच्या बाहेरील डेक, रॅम्प आदी अनुषंगिक कामे स्मार्ट सिटीच्यावतीने करण्यात येत आहेत. त्या कामाची पाहणी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नुकतीच केली. त्यावेळी, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उप नगर अभियंता सुधीर गायकवाड, कार्यकारी अभियंता धनाजी मोदे, महावितरणचे अधिकारी आदी उपस्थित होते.या पाहणी दरम्यान या प्रकल्पाशी निगडित वेगवेगळ्या विषयांची आयुक्त राव यांनी माहिती घेतली.

मध्य रेल्वेच्या मार्गावरून जाणार्‍या उच्च दाब वीज वाहिनीमुळे काम थांबू नये, यासाठी आयुक्तांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना 15 डिसेंबरपर्यंत तात्परुती उपाययोजना आणि महिनाभरात पर्यायी उपाययोजना काढण्याचे निर्देश दिले. तसेच, या वाहिनीचा टॉवर हटवून ही वाहिनी भूमिगत करण्याबाबत रेल्वे, महापालिका आणि महावितरण यांनी एकत्रित मार्ग काढावा, असेही आयुक्तांनी सांगितले नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या कामामुळे बाधित होणार्‍या झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्याबाबतही तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देशही आयुक्तांनी अधिकार्‍यांना दिले.

असे आहे नवीन उपनगरीय रेल्वेस्थानक ..

  • ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे-मुलुंड स्थानकादरम्यान प्रस्तावित नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाची 14.83 एकर जागा उपलब्ध होणेबाबत मा.मुंबई उच्च न्यायालयाचे आदेशानुसार स्टेशनकरीता आवश्यक असलेल्या जागेमध्ये असलेल्या 5 महिला रुग्ण कक्षासाठी महापालिकेने नवीन वास्तू बांधून दिलेली असून त्याचा वापर सुरू झाला आहे.

  • रुग्ण कक्ष स्थलांतरीत झाल्यामुळे नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाचे काम माहे ऑक्टोबर 2023 पासून सुरु करण्यात आले आहे.

  • या नवीन स्थानकाकडे जाण्यासाठी 3 मार्गिका असून 1 मार्गिका पूर्व द्रुतगती मार्गास जोडण्यात येणार आहे.

  • या स्थानकाच्या कामासाठी एकूण रु. 119 कोटी 32 लक्ष तसेच जोडरस्ते आणि सर्क्युलेटिंग एरिया विकसीत करणेसाठी 143 कोटी 70 लक्ष असा एकूण 263 कोटी 2 लक्ष इतका खर्च येणार आहे. हे काम ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड अंतर्गत करण्यात येणार आहे.

  • नवीन स्थानकाचा फायदा प्रामुख्याने वागळे इस्टेट, घोडबंदर रोड परिसरामधील नागरिकांना होणार आहे. तसेच भविष्यात वाढणा-या लोकसंख्येसाठी सदर स्थानक उपयुक्त ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT