ठाणे : स्वप्नवत वाटणारी बुलेट ट्रेन आता सत्यात उतरली असली तरी, भारतीय रेल्वेची गौरवशाली इतिहासाला आज 100 वर्षे पूर्ण झाली आहे. आजच्या दिवशी बोरीबंदर ते कुर्ला या मार्गावर पहिली विजेवर चालणारी रेल्वे धावली होतो. या शतकमहोत्सवी वर्षा निमित्त ठाणे रेल्वे स्थानकात एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी विजेवर धावणार्या डीसी ट्रेनचे भाग (मशीनचे) प्रदर्शन, रांगोळी, सेल्फी पॉइंट आदी ठेवण्यात आले होते.
16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान धावलेली आशियातील (आणि भारतातील) पहिली ट्रेन बोरीबंदर (सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) येथून रवाना झाली. जसजशी वर्षे निघून गेली, तस तसे रेल्वेचे जाळे भारतभर पसरले आहे. जगात चौथ्या क्रमांकाचे भारतीय रेल्वेची गणना होत असून, 3 फेब्रुवारी 1925 रोजी विजेवर धावणारी पहिली ट्रेन बोरीबंदर ते कुर्ला या दरम्यान, धावली होती. या ऐतिहासिक दिवसानंतर रेल्वेचा विस्तार झपाट्याने वाढलेला बघायला मिळतो आहे. विजेवर धावणार्या रेल्वेचा आज शतक महोत्सव रेल्वे साजरा करत आहे. या निमित्ताने ठाणे स्थानकात जुन्या रेल्वेच्या काही आठवणीत राहणारी सामुग्री प्रदर्शनात ठेवली असल्याची माहिती ठाणे रेल्वे व्यवस्थापक केशव तावडे यांनी दिली. या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी वरिष्ठ मण्डल विद्युत अभियंता अर्शद आलम खान , सहाय्यक विद्युत मंडल अभियंता दीपक कारेकर, रेल्वे व्यवस्थापक केशव तावडे, सहाय्यक सुरक्षा आयुक्त अतुल क्षीरसागर, वरिष्ठ निरीक्षक रेल्वे सुरक्षा बल सुरेंद्र कोष्टा आदी मान्यवर उपस्थित होते.