Thane Crime Pudhari
ठाणे

Thane Crime: ठाणे हादरलं! गुंडाने भररस्त्यात केली PSI ची हत्या, पाठलाग करताना विटेने प्रहार

Chitalsar Police Station: ठाण्याच्या चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

पुढारी वृत्तसेवा

Thane Crime News

ठाणे : गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला ठाण्यात मोठी खलबजनक घटना घडली आहे. चितळसर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक गुरुवारी रात्री गस्त घालीत असतांना एक धक्कादायक घटना घडली. दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या एका कुख्यात गुंडास पोलीसांनी ताब्यात घेतले. यावेळी या गुंडाने पोलीस उपनिरीक्षकाच्या डोक्यात सिमेंटच्या विटने जोरदार प्रहार केला आणि त्यांना धक्का देऊन खाली पाडले. या घटनेत चितळसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किसन भोईर हे गंभीर जखमी झाले व त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजू प्रेमकुमार वाल्मिकी (वय 30) या गुंडास पाठलाग करून पकडले. या प्रकरणी शुक्रवारी पहाटे हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चितळसर पोलिस ठाणे हद्दीत 24 सप्टेंबर रोजी रात्री 11.15 वाजेच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक किसन भोईर व पथक हे सुभाषनगर, पोखरण रोड क्र.2 या ठिकाणी सीआरएम मोबाईल व्हॅनमधून गस्त करीत होते. त्यावेळी एका पान स्टॉल जवळ गर्दी दिसून आल्याने किसन भोईर हे वाहनातून उतरून पान स्टॉल चालकास दुकान वेळेत बंद करण्याबाबत समज देत होते.

त्याचवेळी तिथे एक जण गोंधळ करीत असल्याचे दिसून आले. त्या व्यक्तीस शांतता राखण्याची समज दिली असता तो पोलिसांसोबत हुज्जत घालू लागला. सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करू लागला. म्हणून त्याला पोलीस उपनिरीक्षक भोईर यांनी ताब्यात घेतले व त्यास पोलिस वाहनात बसविले. त्यानंतर हा व्यक्ती अधिक आक्रमक झाला व पोउनि किसन भोईर यांना धक्काबुक्की करू लागला. त्याच वेळी त्याने उपनिरीक्षक किसन भोईर यांच्या तोंडावर ठोसा मारून व धक्का मारून वाहनातून उडी मारून बाजूला उभी असलेल्या पांढऱ्या बस मागे पळून गेला.

भोईर हे देखील लाठी घेऊन गाडीच्या खाली उतरून त्याच्या मागे धावले. यावेळी पळून जाणाऱ्या आरोपीने किसन भोईर यांच्या डोक्यात सिमेंट वीटेने जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात किसन भोईर रस्त्यावर जोरात पडले. यावेळी गस्ती पथकातील इतर पोलिसांनी आरोपीचा पाठलाग करून त्यास पकडले. तर किसन भोईर यांना त्वरित टायटन हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना दाखलपूर्व मयत घोषित केले.

या प्रकरणी शुक्रवारी पहाटे चितळसर पोलीस ठाण्यात गु. र. क्र . 307/26 कलम 103(1), 132,121(1)(2), 115(2) 351(2) भा.न्या.संहिता प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT