Pradeep Purnekar Case pudhari photo
ठाणे

Pradeep Purnekar Case : यादव, पवारच्या पोलीस कोठडीत वाढ

दोघांनाही १३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास अधिक खोलात गेल्याने अटक करण्यात आलेल्या निखिल यादव आणि नितेश पवार यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने गुरुवारी आणखी पाच दिवसांची वाढ केली. दोन्ही आरोपींना गुरुवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले होते.

हत्येत वापरलेली शस्त्रे, फरार आरोपी आणि गुन्ह्याशी संबंधित इतर बाबींचा तपास करणे बाकी असल्याने पोलिसांनी कोठडीची मागणी केली. सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने दोघांनाही १३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

पूर्णेकर यांच्या हत्येनंतर तपास करताना पोलिसांनी नितेश पवार याच्याकडील गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल तसेच निखिल यादव याचा मोबाईल फोन कर्नाळा जंगल परिसरातून हस्तगत केला आहे. मात्र हत्येत वापरलेली अन्य शस्त्रे अद्याप हस्तगत करायची असून, या प्रकरणातील आणखी दोन फरार आरोपींचा शोध घेणे बाकी आहे. त्यामुळे आरोपींकडून अधिक माहिती मिळवून तपास पुढे नेण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.

आज पप्या शिंदेला न्यायालयीन कोठडी मिळण्याची शक्यता

पूर्णेकर यांच्या हत्येनंतर त्याच दिवशी अटक करण्यात आलेल्या पप्या शिंदे याची पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपत आहे. तपासासाठी न्यायालयाने त्याला यापूर्वी दोन वेळा पोलीस कोठडी दिली होती. त्यामुळे शुक्रवारी पप्या शिंदे याला पुन्हा ठाणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्याची पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयीन कोठडी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT