भिवंडी: ठाणे जिल्ह्याचा मी सलग पंधरा वर्षे पालकमंत्री होतो. ठाण्याला मी पुर्ण जाणतो असे वक्तव्य राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केले आहे. ते मानकोली येथील क्रीडांगणावर आयोजित माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील चषक या भव्यदिव्य क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,पालघरमध्ये त्यानंतर नवी मुंबई व ठाणे येथे जनता दरबार पार पडले आता पुढची तारीख मी जाहीर केली आहे. लवकरच समजेल असे सांगत एकूण एक तालुक्यात मी जनता दरबार घेत फिरणार आहे. भिवंडी सह शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, बदलापूर कल्याण तर पालघर जिल्ह्यातील वसई, वाडा, जव्हार, मोखाडा या सर्व जिल्ह्यात या सर्व तालुक्यांमध्ये मी जनता दरबार घेणार आहे.ज्यांना उभारी घ्यायची असते त्यांना फक्त परमेश्वराची कृपा असावी लागते असे सांगत एकप्रकारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोपरखळी मारली आहे.
कपिल पाटील यांना माजी मंत्री म्हणून स्पर्धा भरवण्याची गरज नाही, त्यांच्या कामातून त्यांचे नाव सर्वत्र राज्यात चर्चेत आहे. 20 वर्षां पूर्वी सुरू झालेली ही स्पर्धा कणाकणाने वाढत गेली. हा इव्हेंट सर्वदूर पसरलेला आहे. समाजाचे बळकटीकरण व्हावे नुसते शरीराने नव्हे तर मनाने सुद्धा तरुण वर्ग सुदृढ व्हावा ही या स्पर्धा भरणार्या मागील भावना आहे. यावर जिल्हा परिषद सदस्य असताना 2005 पासून सुरू झालेली ही स्पर्धा माझ्या जीवनातील राजकीय टप्प्यातील प्रत्येक यशानंतर ही स्पर्धा सुद्धा वाढत गेली आहे.वीस वर्षांमध्ये आज भव्य दिव्य अशा स्वरूपात ही स्पर्धा संपन्न होत आहे. साहजिकच या स्पर्धे मध्ये खेळण्यासाठी सर्व टेनिस क्रिकेटपटू उत्साही आहेत.असे आयोजक कपिल पाटील यांनी स्पष्ट केले.. या कार्यक्रमा दरम्यान कोनगाव येथील शिव चरोबा सामाजिक संघटनेचे राजु हेंदर म्हात्रे यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह भाजपा पक्षात प्रवेश केला