ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांची ताकद कमी करण्यासाठी शिवसेना - भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. यापूर्वी कळवा -मुंब्र्यातील दहा माजी नगरसेवकांना फोडून आव्हाड यांना कमजोर केले. त्यानंतर कट्टर समर्थक अमित सरैय्या यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आज उपमुख्यमंत्री सुहास देसाई यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याने ठाणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस कमजोर बनली आहे.
राबोडी मतदार संघात अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष नजीब मुल्ला यांच्या पॅनलमधील सहकारी देसाई हे पुन्हा त्यांच्यासोबत आल्याने पॅनल मजबूत बनला आहे. युवक काँग्रेसचे अध्यक्ष विक्रम खामकर यांनी देखील आव्हाडांना सोडून शिवसेनेत प्रवेश केला. या राजकीय घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी आगामी महापालिका निवडणुकीची तयारी सुरु केल्याची चर्चा रंगली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शहर पवार पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई यांनी पक्षाला रामराम केल्याने रिक्त झालेल्या अध्यक्षपदी कळव्यातील अरविंद मोरे यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. वर्षा मोरे ह्या कळव्यातील एकमेव नगरसेवक आव्हाड यांच्यासोबत राहिलेल्या आहेत. पक्षाला नव्याने पुन्हा उभारी मिळण्यासाठी कट्टर कार्यकर्त्याची गरज असल्याची चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे माजी विरोधी पक्ष नेते शानू पठाण यांच्याही नावाची चर्चा रंगली आहे.