Thane Police : मद्यपी चालकांवर ठाणे पोलिसांची करडी नजर Pudhari
ठाणे

Thane Police : मद्यपी चालकांवर ठाणे पोलिसांची करडी नजर

नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस सज्ज

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाचे स्वागत स्वतःचा तसेच, इतरांचाही जीव संभाळून करा, असे आवाहन ठाणे शहर वाहतुक शाखेचे उप आयुक्त पंकज शिरसाठ यांनी केले आहे. यंदा मनपा निवडणुक आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस सज्ज झाले असुन वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तसेच मद्यपी वाहन चालकांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. याकरिता ठाणे पोलीस आयुक्तालयात ५४ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असुन वाहतुक शाखेचे ७३९ इतके मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. असेही उप आयुक्त पंकज शिरसाठ यांनी सांगितले.

थर्टी फर्स्ट व नववर्ष स्वागता सोबतच यंदा ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील ठाणे महानगरपालिका, कल्याण-डोंबिवली मनपा, उल्हासनगर मनपा आणि भिवंडी-निजामपुर महानगरपालिका यांच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. या पार्श्वभुमीवर ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या निर्देशानुसार वाहतुक शाखेमध्ये ५९ अधिकारी व ६८० कर्मचारी असे एकूण ७३९ इतके मनुष्यबळ तैनात केले आहे. आयुक्तालय क्षेत्रात एकुण ५४ ठिकाणी वाहतूक पोलिसांची नाकाबंदी असून यात येऊर, उपवन, दुर्गाडी, कटाई नाका, मुंब्रा, रांजणोली नाका ही ठिकाणे हॉटस्पॉट म्हणून चिन्हित केली आहेत. या ठिकाणी दारू पिऊन गाडी चालवणे, रस्त्यावर धांगडधिंगा करणे किंवा सार्वजनिक ठिकाणी त्रासदायक वर्तन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, यंदा २०२५ या वर्षात लोक अदालतमध्ये (न्यायालयात) १ लाख ४२ हजार ६०७ ई चलन कारवाई करण्यात आली असुन एकुण १४ कोटी ३४ लाख ४३ हजार २०० इतका दंड वाहन चालकांनी न्यायालयात भरणा केला आहे.

डिसेंबरमध्ये मद्यपी चालकांची संख्या घटली

सद्यस्थितीत मद्यपी चालकांची संख्या घटली आहे. यावर्षी नोव्हेंबर महिन्यात ९४५ ड्रंक ॲण्ड ड्राईव्हच्या केसेस झाल्या तर, डिसेंबरमध्ये ६४६ इतक्याच केसेस झाल्या आहेत. यामध्ये ५१ ब्रेथ ॲनालायझर मशिनद्वारे चालकांची पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. तत्काळ कडक कारवाई करण्यात येणार असून आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT