ठाणे : मोर शेराटी, काळ्या डोक्याची शेराटी, समुद्र गरूड आणि धनेश या दुर्मीळ होत चाललेल्या पक्षांचे दर्शन उत्तन कोपरा डोंगरी गावाच्या खाडी किनारी पक्षीप्रेमींना घडले. वन विभाग आणि फॉर फ्युचर इंडियातर्फे मीरा भाईंदर उत्तन येथे वीकेंडला पक्षी निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या पक्षीनिरीक्षणात निसर्गप्रेमींना 15 हून आधिक पक्षांचे दर्शन झाले.
पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांच्या स्मरणार्थ, 5 ते 12 नोव्हेंबर दरम्यान भारतात सलीम अली पक्षी गणना आणि महाराष्ट्रात पक्षी सप्ताह म्हणून पाळला जातो. याचाच एक भाग म्हणून निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन गेल्या 4 वर्षांपासून करण्यात येते. यंदा या पक्षी निरीक्षणात 50 हून अधिक निसर्गप्रेमींनी सहभाग घेतला, तर सरासरी प्रत्येक दिवशी 15 हून अधिक पक्षांचे निरीक्षण केले. कांदळवन क्षेत्र स्थलांतर पक्षांसाठी किती महत्वाचे आहे, याविषयी यावेळी प्रबोधन करण्यात आले. स्थलांतरित पक्षांसाठी कांदळवनाचे महत्त्व अधोरेखित केले
आणि वाढत्या मानवी अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर संवर्धनाची आव्हानांबाबत यावेळी चर्चा झाली. फॉर फ्युचर इंडियाचे हर्षद ढगे, मँग्रोव्ह फाउंडेशनचे अमेय भोगटे, सुचित्रा पालये यांनी पक्षी निरीक्षणासाठी मार्गदर्शन केले.
पहिला दिवस : ड्रोंगो, कॉमन काईट, पॉन्ड हेरॉन, पर्पल हेरॉन, ग्रे हेरॉन, ग्रेट एग्रेट, लिटल एग्रेट, इंटरमीडिएट एग्रेट, ग्रीन बी ईटर, पेंटेड स्टॉर्क, बुलबुल, मैना, काळा पतंग, विणकर, ब्लॅक हेड इबिस, कॉमन क्रो, ग्लॉसी आयबिस, इंडियन ग्रे हॉर्नबिल, पांढरा पोट असलेला सागरी गरुड
दुसरा दिवस : ड्रोंगो, स्पॉटेड डव्ह, मैना, विणकर, काळा पतंग, सूर्य पक्षी, क्रिएट/लिटल एग्रेट, इंटरमीडिएट एग्रेट, पॉन्ड हेरॉन, इंडियन कॉर्मोरंट, कोयल, सँडपायपर, कॉमन प्लोव्हर, लाँग-टेलेड श्राइक, लॅपविंग, बुलबुल, युरेशियन ट्री स्पॅरो,
तिसरा दिवस : ड्रोंगो, इंटरमीडिएट एग्रेट, मैना, शिक्रा, लाँग टेलेड श्राइक, सनबर्ड, स्विफ्टबर्ड, स्वॅलो, बुलबुल, रेड व्हेंटेड बुलबुल, इंडियन कॉर्मोरंट, लिटल एग्रेट, ग्रेट एग्रेट, कॉमन प्लोव्हेट
2021 ते 2023 या तीन वर्षांत पक्षी निरीक्षकांना दोन तासांच्या कालावधीत 40 हून अधिक विविध पक्ष्यांच्या प्रजातींचे निरीक्षण केले. तथापि, या वर्षी, कांदळवन र्हास आणि भरतीच्या पाण्याच्या अडवल्यामुळे 20 पेक्षा कमी प्रजाती पाहिल्या गेल्या आहेत, मानवी अतिक्रमण व हस्तक्षेप झाल्याने स्थलांतर पक्षांच्या सवयीत व संख्येत मोठ्याप्रमाणत बदल दिसून येत आहे.हर्षद ढगे, संस्थापक फॉर फ्युचर इंडिया